Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन सेल्फ-आयसोलेट; काही दिवसांपूर्वी जवळचे व्यक्ती झाले होते कोरोनाबाधित

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन सेल्फ-आयसोलेट; काही दिवसांपूर्वी जवळचे व्यक्ती झाले होते कोरोनाबाधित

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीती दरम्यान, कोरोना संसर्ग पुन्हा फैलावताना दिसत आहे. या प्रादुर्भावादरम्यान, आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुतीन यांच्या काही जवळच्या नातेवाईकांमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते, त्यानंतर त्यांनी स्वतःला विलग ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुतीन हे कोरोना संसर्गापासून दूर राहवे यासाठी विशेष व्यवस्था केली जात आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अजूनही पुतीन यांची काळजी घेत असल्याची माहिती मिळतेय. तर जे त्यांना भेटतात त्यांना आयसोलेट करण्यात येत आहे.

एएफपी न्यूज एजन्सीनुसार, पुतीन या आठवड्यात ताजिकिस्तानला भेट देणार होते, मात्र आता ते शक्य होणार नसल्याची माहिती देण्यात येत आहे. कोरोना रूग्णांची नोंद झाल्यानंतर अलिप्त असलेले पुतीन या आठवड्यात ताजिकिस्तानला जाणार नाहीत, जिथे ते प्रादेशिक सुरक्षेबाबत बैठका घेणार होते. या रशियन नेत्याने कोरोना साथीच्या काळात अनेक आरोग्य खबरदारी घेतली आणि स्पुतनिक-व्ही या कोविड -19 लसीचे दोन डोस देखील घेतले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनीही अलीकडच्या काळात अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांनी रशियन पॅरालिम्पिक खेळाडू आणि सीरियाचे अध्यक्ष बशर असद यांचीही भेट घेतली होती.

- Advertisement -

दरम्यान, कोरोनाने रशियामध्ये कहर केला आहे. गेल्या २४ तासांमध्ये १७,८३७ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहेत. साथीच्या आजारामुळे रशियामध्ये आतापर्यंत १,९४,२४९ लोकांनी आपला जीव गमावला आहे. जगातील सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत रशिया पाचव्या क्रमांकावर आहे, त्यानंतर ब्रिटन, ब्राझील, भारत आणि अमेरिका यांचा क्रमांक लागतो.


चीनमध्ये डेल्टाचा कहर! चीनचे हे शहर संपूर्ण सील; थिएटर-जिमसह सार्वजनिक ठिकाणं बंद

- Advertisement -