घरअर्थजगतसिलिंडरवर लागणार क्यूआर कोड; गॅस चोरी रोखण्याकरिता केंद्र सरकारचा डिजिटल उपाय

सिलिंडरवर लागणार क्यूआर कोड; गॅस चोरी रोखण्याकरिता केंद्र सरकारचा डिजिटल उपाय

Subscribe

वर्ल्ड एपीजी विक २०२२ मध्ये हरदीप सिंह पुरी यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली. येत्या तीन महिन्यांत सर्व सिलिंडरवर क्युआर कोड लावण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी गॅस सिलिंडरबाबत तक्रार केल्यास संपूर्ण डेटा एका क्लिकवर प्राप्त होणार आहे.

नवी दिल्ली – जर तुम्ही एलपीजी सिलिंडरचा (LPG Cylinder) वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेकदा आपल्या घरी आलेला सिलिंडर वजनाने हलका लागतो. याचा अर्थ सिलिंडरमधील गॅस चोरी (Gas Theft) केली जाते. मात्र, हीच गॅस चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) मोठं पाऊल उचललं आहे. यापुढे तुमच्या घरी क्यूआर कोड (QR Code) असलेला सिलिंडर येणार आहे, यामुळे गॅस चोरी करण्यांना ट्रॅक करता येणार आहे.

हेही वाचा – रेल्वेगाड्यांचे गुरांपासून होणार संरक्षण, रेल्वे मंत्रालय करणार उपाययोजना

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून गॅस चोरीचे प्रमाण वाढले आहे. चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने सिलिंडरवर QR Code लावण्याची योजना सुरू करणार आहे. गॅस सिलिंडर घरी पोहोचवणाऱ्यांकडून गॅस चोरी केली जायची. QR Code पद्धत राबवण्यात आली तर, कोणत्या व्यक्तीने गॅस सिलिंडर चोरी केली याचा शोध घेण्यास सोपं जाणार आहे.

हेही वाचा – Indian Railways: रेल्वे प्रवासातील फूड मेनू बदलणार, IRCTCची नवी सुविधा

- Advertisement -

एखादा सिलिंडर कितीवेळा रिफिल (Cylinder Refilling) केला आहे, हे QR Code मुळे कळू शकणार आहे. तसंच, कोणत्या डिलरकडून कोणाला डिलिव्हरी झाली आहे हेसुद्धा या क्युआर कोडमधून समजणार आहे. गॅस चोरीच्या तक्रारी वाढल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यात ही व्यवस्था केली जाणार आहे.


गॅस सिलिंडरवर लावण्यात येणारे क्युआर कोड आपल्या आधार कार्डप्रमाणे काम करणार आहे. म्हणजे, हा क्युआर कोड सिलिंडरची ओळख असणार आहे. वर्ल्ड एपीजी विक २०२२ मध्ये हरदीप सिंह पुरी यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली. येत्या तीन महिन्यांत सर्व सिलिंडरवर क्युआर कोड लावण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी गॅस सिलिंडरबाबत तक्रार केल्यास संपूर्ण डेटा एका क्लिकवर प्राप्त होणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -