घरदेश-विदेशQS University Rankings-Asia : भारताने चीनला मागे टाकले; आशिया यादीत 'इतक्या' विद्यापीठांचा...

QS University Rankings-Asia : भारताने चीनला मागे टाकले; आशिया यादीत ‘इतक्या’ विद्यापीठांचा समावेश

Subscribe

नवी दिल्ली : 2024 च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीतील आशियाची यादी QS ने प्रसिद्ध केली आहे. आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बॉम्बेसह उच्च शिक्षणाच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले आहे. विशेष या यादीत आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बॉम्बे या विद्यापीठांचाही समावेश आहे. (QS University Rankings Asia  India overtakes China Inclusion of 148 universities in Asia list)

QS ने प्रसिद्ध केलेल्या टॉप एशिया विद्यापीठ रँकिंगमध्ये भारतातील 148 विद्यापीठांचा समावेश आहे, ज्यामध्ये एकूण 856 विद्यापीठे सूचीबद्ध आहेत. चीन 133 विद्यापीठांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि जपान 96 विद्यापीठांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीतील टॉप 50 मध्ये आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बॉम्बे यांचा समावेश आहे, तर अशा 5 संस्था देखील आहेत, ज्यांचा टॉप 10 मध्ये समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – फडणवीसांपेक्षा आदित्य ठाकरेंमध्ये जास्त ‘टॅलेंट’; व्हायरल व्हिडीओ प्रकरणी राणेंचा राऊतांना टोला

बुधवारी प्रसिद्ध झालेल्या क्रमवारीत 856 विद्यापीठे आणि 25 देशांचा समावेश आहे. यात भारतातील 21 विद्यापीठांनी वर्षानुवर्षे कामगिरीमध्ये सातत्याने सुधारणा केली आहे. या यादीतील 15 मध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि 37 नवीन नोंदी आहेत. जर एशिया यादीत भारताच्या नवीन प्रवेशांची संख्या पाहिली तर, यात भारताची संख्या सर्वाधिक आहे. चीनमधील फक्त 7 विद्यापीठांचा नवीन प्रवेश झाला आहे.

- Advertisement -

QS रँकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष बेन यांच्या मते, क्यूएसमधील भारतीय विद्यापीठांचा वाढता सहभाग भारतातील उच्च शिक्षण प्रणाली सतत विस्तारत असल्याचे सूचित करतो. याशिवाय भारतीय संस्थांचे संशोधनाचे योगदानही त्यांच्या विकासात खूप महत्त्वाचे आहे. यावरून या संस्था जागतिक समुदायाच्या बरोबरीने उभ्या असल्याचे दिसून येते असल्याचा विश्वास बेन यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – पंतप्रधान मोदी सगळे निर्णय अदानींच्या फायद्यासाठी घेतात; राहुल गांधींचा घणाघात

आयआयटी बॉम्बे 40व्या स्थानावर

QS ने प्रसिद्ध केलेल्या 856 विद्यापीठांमध्ये आयआयटी बॉम्बे भारतातील या यादीत 40व्या स्थानावर आहे. त्यानंतर आयआयटी दिल्ली 46व्या आणि आयआयटी मद्रास 53व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, 2023 मध्ये भारतात 118 विद्यापीठे आणि 2024 मध्ये 148 विद्यापीठे असल्याने आणखी 30 महाविद्यालयांचा रँकिंग यादीत समावेश करण्यात आला आहे क्यूएस यादीत भारतातील सर्वाधिक विद्यापीठांचा समावेश हे दर्शविते की, येथील उच्च शिक्षण व्यवस्थेत योग्य दिशेने सातत्याने बदल होत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -