घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटक्वारंटाईनमुळे ताण आणि नैराश्य वाढतंय - संशोधन

क्वारंटाईनमुळे ताण आणि नैराश्य वाढतंय – संशोधन

Subscribe

कोरोना व्हायरसमुळे सर्वांनाच लॉकडाऊन अनिवार्य झाले आहे. मात्र लॉकडाऊनमधील क्वारंटाईन हे मानसिक आरोग्यवर परिणाम करत असल्याचे अनुमान एका अभ्यासाअंती काढण्यात आला आहे. अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे प्राध्यापक उपेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात लक्षणे नसलेल्या आणि क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यावेळी सामान्य परिस्थितीपेक्षा क्वारंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तिंवर अधिक ताण असल्याचे समोर आले.

या सर्वेक्षणात ३८० व्यक्तिंचा सहभाग घेण्यात आला होता. यातील व्यक्तिंचे सरासरी वयोमान हे ३३.५ वर्ष होते. तर यातील ७२ टक्के रुग्ण पुरुष होते. सर्व रुग्ण शिक्षित असून त्यातील ६६ टक्के रुग्ण हे उच्चशिक्षित होते. जेव्हा या सर्व रुग्णांना त्यांच्या क्वारंटाईनमधील अनुभवांबाबत विचारपूस केली असता त्यातील ४६ टक्के रुग्ण हे तणावाखाली असल्याचे आढळले. तर १४ टक्के रुग्ण हे कमालीचे चिंताग्रस्त होते आणि ८ टक्के रुग्ण हे नैराश्यात लोटले गेले होते. मानसिक आरोग्यसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा नसल्यामुळे रुग्ण तणावाखाली येत असल्याचे या अभ्यासाअंती लक्षात आले.

- Advertisement -

सध्या देशभरात १ लाख ३८ हजार ९४७ रुग्ण आहेत. त्यापैकी ५७,७०० रुग्ण बरे झालेले आहेत. तर ७७ हजार २१४ रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत. कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सदर रुग्णाच्या लक्षणानुसार त्याच्यावर उपचार करण्यात येतात. लक्षणे नसलेल्या रुग्णांना क्वारंटाईन करण्यात येते. तर मध्यम आणि तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यावर उपचार केले जातात.

कोरोना व्हायरसपासून जरी मुक्ती मिळण्याची संख्या जास्त असली तरी त्याचा तणाव येतोच. तसेच कोरोनामुळे रुतलेले अर्थचक्र, आपल्यामुळे कुटुंबालाही कोरोनाचा निर्माण झालेला धोका या सगळ्या विचारांचा प्रभाव रुग्णाच्या मानसिक आरोग्यवर होत असतो. त्यातच आरोग्य व्यवस्थेतला फोलपणा देखील आता समोर येऊ लागला आहे. त्यामुळे रुग्णांच्या मनामध्ये आपले जीवित आणि भविष्याची अनामिक भीती दाटून राहते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -