घरताज्या घडामोडी१४ दिवसांचा क्वारनटाईन अवधी पुरेसा नाही

१४ दिवसांचा क्वारनटाईन अवधी पुरेसा नाही

Subscribe

जगात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून जगभरात आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा १३ हजारावर गेला आहे. तर तीन लाखाहून अधिक नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. यामुळे करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी संशयितांना १४ दिवस क्वारनटाईन करण्यात येत आहे. पण हा अवधी पुरेसा नसल्याचा दावा कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या इन्फेक्शन कंट्रोल अँड हॉस्पिटल एपिडेमियोलॉजी जर्नलमध्ये संशोधकांनी केला आहे. २० जानेवारी ते १२ फेब्रुवारी या दरम्यानच्या काळातील १७५ करोनाग्रस्त व संशयितांचा अभ्यास केल्यानंतरच हा दावा करण्यात आला आहे.

यात चीनमधील वुहान प्रांतात प्रवास करणाऱ्या करोनाग्रस्त व संशयितांचा सहभाग होता. यात प्रामुख्याने ४१ वर्षांच्या व्यक्ती होत्या. त्यांच्या प्रकृतीतील बदलांचा अभ्यास केल्यानंतर संशयितांची लक्षण कळण्यासाठी १४ नाही तर १७ दिवसांचा अवधी लागतो असे चार लेऊंग यांनी म्हटले आहे. ज्यांनी या अहवालाचा नमुना तयार केला आहे. तसेच क्वारनटाईन अवधी हा देखील गांभीर्याने घेतला पाहीजे असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -