Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Chandrayaan-3 : ब्रिटिश पत्रकारांची डोकी फिरली..., चांद्रयान-3 च्या यशावर उपस्थित केले प्रश्न

Chandrayaan-3 : ब्रिटिश पत्रकारांची डोकी फिरली…, चांद्रयान-3 च्या यशावर उपस्थित केले प्रश्न

Subscribe

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच 'ISRO' ने केलेल्या अभुतपूर्व अशा कामगिरीमुळे जगभरात भारताची मान उंचावली आहे. प्रत्येक भारतीय या मोहीमेनंतर सोशल मीडियावर विविध पोस्ट करत होता. विदेशातील मंत्री, नेते, राष्ट्राध्यक्षांकडून देखील भारताला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. परंतु भारताचे हे यश अनेकांना पचणी पडत नसल्याचेच दिसून येत आहे. यामध्ये समावेश आहे, तो म्हणजे ब्रिटिश पत्रकारांचा.

नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘ISRO’ ने केलेल्या अभुतपूर्व अशा कामगिरीमुळे जगभरात भारताची मान उंचावली आहे. इस्रोने चांद्रयान-3 हे यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड केरून मोठा इतिहास रचला आहे. 23 ऑगस्ट 2023 हा दिवसाच्या भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेलेला आहे. काल बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या भुपृष्ठावर चांद्रयान-3 यशस्वीरित्या लँड झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार भारत हा पहिला देश ठरला आहे. त्यामुळे या मोहीमेत सहभागी असणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे विशेष असे कौतुक करण्यात येत आहे. प्रत्येक भारतीय या मोहीमेनंतर सोशल मीडियावर विविध पोस्ट करत होता. विदेशातील मंत्री, नेते, राष्ट्राध्यक्षांकडून देखील भारताला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. परंतु भारताचे हे यश अनेकांना पचणी पडत नसल्याचेच दिसून येत आहे. यामध्ये समावेश आहे, तो म्हणजे ब्रिटिश पत्रकारांचा. (Questions raised by a British journalist after the success of Chandrayaan-3)

हेही वाचा – Chandrayaan-3 च्या यशस्वी लँडिंगमुळे ‘त्या’ ब्रिटिश पत्रकाराचे तोंड झाले बंद 

- Advertisement -

चांद्रयान-3ने अवकाशात झेप घेतल्यानंतर एका ब्रिटिश पत्रकाराने याबाबत बोलताना खोचक टिप्पणी केली होती. ज्या देशात करोडो लोकांना टॉयलेटही उपलब्ध नाही, अशा देशाने अंतराळ कार्यक्रमावर शेकडो कोटी रुपये खर्च करावेत का? असा प्रश्न बीबीसी न्यूजच्या ब्रिटिश पत्रकाराकडून उपस्थित करण्यात आला होता. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ रिट्विट करत त्याला उत्तर दिले होते. परंतु आता आणखी एका ब्रिटिश पत्रकाराने चांद्रयान 3 यशानंतर भारतावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

बीबीसी वृत्तवाहिनीच्या पत्रकारानंतर आता जीबीएस या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने भारताला ब्रिटनने दिलेले पैसे परत करावे, अशी मागणी केली आहे. मुळात ब्रिटनने भारताला पैसे दिले असल्याचा दावा या पत्रकाराकडून करण्यात आला आहे. पॅट्रिक ख्रिस्टिस असे पकत्रकाराचे नाव असून ते म्हणाले की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या यान उतरवल्याबद्दल मी भारताचे अभिनंदन करतो. पण मी भारताला असेही आवाहन करतो की 2016 ते 2021 या काळात ब्रिटिश सरकारने भारताला आर्थिक मदत म्हणून दिलेले 24 हजार कोटी रुपये भारताने परत करावेत. पुढच्या वर्षभरात ब्रिटन भारताला 597 कोटी रुपये देणार आहे. पण मला वाटते, ब्रिटिश करदात्यांनी हा पैसा थांबवावा.

- Advertisement -

तसेच, अंतराळ संशोधन कार्यक्रम असणाऱ्या देशांना आपण पैसा द्यायचा नाही असा नियम आपण करायला हवा. जर तुम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवू शकता, तर मग तुम्ही आमच्याकडे आर्थिक मदत मागायलाच नको. संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार भारतात जगभरातले सर्वाधिक गरीब राहतात. भारत ही जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचा जीडीपी 3.75 ट्रिलियन डॉलर्स आहे. जर भारत सरकारच त्यांच्या देशातील गरीब लोकांचा विचार करत नसेल, तर आपण तरी त्यांचा विचार करून त्यांना आर्थिक मदत का द्यायची? असा प्रश्न या पत्रकाराकडून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisment -