घरदेश-विदेशकुतुब मिनारचं ५० वर्षांनंतर नूतनीकरण

कुतुब मिनारचं ५० वर्षांनंतर नूतनीकरण

Subscribe

देशातील सर्वात उंच मिनारचं तब्बल ५० वर्षांनंतर नूतनीकरण करण्यात येत आहे. दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं असून संपूर्ण कामासाठी साधारण प्रस्तावित ८ लाख रुपये खर्च आला आहे आणि हे काम साधारण जुलै महिन्याच्या शेवटी पूर्ण होईल.

कुतुब मिनारचं ५० वर्षांनंतर पुन्हा नूतनीकरण चालू झालं असून कुतुब मिनारच्या खिडक्या आणि दरवाजे बदलण्याचं काम नुकतंच करायला सुरुवात झाली असल्याची माहिती एएसआयचे वरीष्ठ अधिकारी यांनी सांगितलं आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील सर्वात उंच मिनारचं तब्बल ५० वर्षांनंतर नूतनीकरण करण्यात येत आहे.

खिडक्या आणि दरवाजे खराब

कुतुब मिनारमधील सर्व लाकडी खिडक्या आणि दरवाजे खराब झाल्यामुळं तिथे अनेक पक्षांनी आपली घरटी बनवायलादेखील सुरुवात केली होती. त्यामुळं या विशाल स्मारकाची दुर्दशा व्हायच्या आत त्याच्या डागडुजीला सुरुवात करण्यात आली आहे. कुतुब मिनार हा युनेक्स वर्ल्ड हेरिटेज कुतुब कॉम्प्लेक्सचा एक भाग आहे. ‘महिनाभर आधीच दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं असून संपूर्ण कामासाठी साधारण प्रस्तावित ८ लाख रुपये खर्च आला आहे आणि हे काम साधारण जुलै महिन्याच्या शेवटी पूर्ण होईल.’ अशी माहिती एन. के. पाठक, अधीक्षक पुरातत्त्वतज्ज्ञ, एएसआय (दिल्ली मंडळ) यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली आहे. कुतुब मिनारच्या चार वेगवेगळ्या पातळी असून जगातील सर्वात मोठा आणि सुंदर असा हा मिनार आहे.

- Advertisement -

एएसआयची माहिती

आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय)द्वारे सांगितल्यानुसार, ‘मिनारचा व्यास हा १४.३२ डायामीटर तळ असून त्याचा वरचा भाग हा २.७५ मीटरचा आहे. तर तिनही मजले हे लाल खडे आणि संगमरवरील दगडांनी भारलेले आहेत. तर इथले लाकडी दरवाजे आणि खिडक्या यामध्ये पक्षांनी विशेषतः कबुतरांचं वास्तव्य वाढलं होतं. त्यातही त्यांच्या विष्ठा आणि पिसांमुळं जास्तच खराब होत चालले होते. या सगळ्यामुळंच दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.’ अशी माहिती पाठक यांनी दिली आहे. तर दरवाजे, खिडक्या यांची संख्या साधारण ३७ असून तळमजल्यावरील एक मुख्य दरवाजा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. नवीन दरवाजे आणि खिडक्यांना लाकडाची फ्रेम असून मेटलनेटमुळं हवा यायला जागा राहणार असल्याचंही पाठक यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -