Russia Ukraine News: भारताची प्रतिमा मलिन करण्याचा चीनचा डाव पीआयबी फॅक्टने उधळला

हे प्रकरण नेमकं काय आहे? वाचा

Qutub Minar lit up with colours of Russian flag? Chinese state media spreads fake news

चीनची भारताविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कट रचून खोटं पसरवण्याची मोहिम सुरू आहे. आता चीननं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी एक नवीन खोटी गोष्ट पसरवली आहे. चीनचे सरकारी माध्यम ग्लोबल टाईम्सने आपल्या ७ मार्चला ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘दिल्लीमध्ये कुतुब मीनारच्या इमारतीवर रशियन झेंड्याच्या रंगानं रोषणाई केली आहे.’ याचा फोटो चीनने सर्वत्र पसरवला आहे. मात्र चीनचा हा डाव पीआयबी फॅक्टने उधळवून लावला आहे.

या फोटोमध्ये कुतुब मीनारवर निळा आणि लाल रंग दिसत आहे. याच्या आधारावर चीननं कुतुब मीनारवर रशियन झेंडा लावल्याचं खोटं पसरवलं आहे. जेणेकरून जगात एक वेगळा भारताप्रती संदेश पोहोचवा की, युक्रेन आणि रशिया युद्धात भारत रशियाला समर्थन करत आहे. पण पीआयबीनं चीनचा हा दावा फेटाळला आहे.

पीआयबी फॅक्ट चेकमध्ये चीनच्या ग्लोबल टाईम्सचा दावा खोटा असल्याचं सांगितलं आहे. फॅक्ट चेकमध्ये आढळले आहे की, लालकिल्ल्यावर निळा आणि लाल रंगाच्या थीम व्यतिरिक्त प्रधानमंत्री जन औषधी परियोजनेबाबत लिहिलं आहे.

फक्त रंग पाहून खोटं पसरवणाऱ्या चीननं एकदाही फोटो मागील सत्य जाणण्याचा प्रयत्न केला नाही. किंवा सत्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलं.

सत्य काय आहे?

स्वातंत्र दिनाच्या अमृत महोत्सवावर कुतुब मीनार प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेच्या थीमच्या रंगात सजले होते. पीआयबीने फॅक्ट चेकमध्ये कुतुब मीनारवर रशियन झेंड्याची थीम नसल्याचं स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा – Ukraine-Russia War: रशियाच्या निशाण्यावर असलेल्या युक्रेनच्या सूमी युनिव्हर्सिटीमध्ये 750हून अधिक अडकले भारतीय विद्यार्थी