घरदेश-विदेशवैष्णोदेवी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनो ही बातमी वाचा, नाहीतर बसेल दंड

वैष्णोदेवी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनो ही बातमी वाचा, नाहीतर बसेल दंड

Subscribe

या वर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात चेंगराचेंरी होऊन १४ भाविकांचा मृत्यू झाला होता. तर, अनेक भाविक जखमी होते. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी श्राइन बोर्ड प्रशासनाने शारदीय नवरात्रापासून अत्याधुनिक आरएफआयडी ट्रॅव्हल कार्ड सुविधा सुरू करण्यात आली आहे.

कटरा – माता वैष्णोदेवीच्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी श्राइन बोर्ड प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिटी कार्डशिवाय (Radio Frequency Identification Card) प्रवास करणाऱ्या भाविकांकडून 100 रुपये दंड वसूल केला जाणार आहे. तसेच, कार्ड नसल्यास प्रवास रद्द करून भाविकांना परत पाठवले जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा नियम तात्काळ लागू करण्यात आला आहे.

या वर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णोदेवी मंदिराच्या परिसरात चेंगराचेंरी होऊन १४ भाविकांचा मृत्यू झाला होता. तर, अनेक भाविक जखमी होते. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी श्राइन बोर्ड प्रशासनाने शारदीय नवरात्रापासून अत्याधुनिक आरएफआयडी ट्रॅव्हल कार्ड सुविधा सुरू करण्यात आली आहे. प्रवास करणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूने RFID ट्रॅव्हल कार्ड घेणे बंधनकारक आहे. या कार्डामुळे प्रवासादरम्यान भाविकांचा माग काढण्यासोबतच गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे होणार आहे.

- Advertisement -

दर्शन घेऊन झाल्यानंतर भाविकांकडून कार्डे परत घेतली जातात. कार्ड परत घेण्याकरता नवीन ताराकोट मार्ग, कटरा हेलिपॅड, श्री माता वैष्णोदेवी रेल्वे स्टेशन कटरा आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचारी तैनात केले आहेत. यासोबतच अत्याधुनिक स्कॅनरच्या सहाय्याने मॉनिटरिंग करण्यात येत आहे. मात्र, माँ वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर ९७ टक्के भाविक प्रवासपत्रिका जमा करतात. तर, तीन टक्के भाविक कार्ड परत करत नसल्याचं समोर आलं आहे.

जम्मू रेल्वे स्थानकावर असलेल्या वैष्णवी धाम येथे एक यात्रा नोंदणी केंद्र देखील स्थापन करण्यात आले आहे. कटरा येथील मुख्य बसस्थानकावरील मुख्य प्रवास नोंदणी केंद्रावर 20 काउंटर उभारण्यात आले आहेत. यापैकी 14 कार्यरत आहेत. बसस्थानकाजवळील निहारिका येथे एक, वैष्णोदेवी रेल्वे स्थानक कटरा येथे चार, आंतरराज्यीय बसस्थानक क्रमांक दोनवर 10, यापैकी सहा काउंटर कार्यरत आहेत. त्याचवेळी कटरा हेलिपॅडवर एक, योग आश्रम येथील बीएसएफ कार्यालयात एक, बाणगंगा परिसरातील लष्कराच्या कार्यालयात एक आणि तारकोट मार्गाच्या प्रवेशद्वारावर प्रवास नोंदणी केंद्र उभारण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -