घरदेश-विदेशन्यू फरक्का एक्स्प्रेसचे ६ डब्बे रुळावरुन घसरले; ७ प्रवाशांचा मृत्यू

न्यू फरक्का एक्स्प्रेसचे ६ डब्बे रुळावरुन घसरले; ७ प्रवाशांचा मृत्यू

Subscribe

उत्तरप्रदेशमध्ये रेल्वेला मोठा अपघात झाला आहे. रायबरेलीजवळच्या हरचंदपूरमध्ये न्यू फरक्का एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरुन घसरले. घटनास्थळावर एनडीआरएफ आणि रेल्वे प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे.

उत्तरप्रदेशच्या रायबरेलीमध्ये रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी रायबरेलीजवळच्या हरचंदपूरमध्ये न्यू फरक्का एक्स्प्रेसचे ६ डबे रुळावरुन घसरले. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला तर ३५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळावर डीएम आणि पोलीस अधिकारी पोहचले असून तपास सुरु आहे.

- Advertisement -

५ प्रवाशांचा मृत्यू तर २५ जखमी

न्यू फरक्का एक्स्प्रेस मालदा येथून दिल्लीला जात होती. त्यावेळी अचानक इंजिनसह ६ डबे रुळावरुन घसरले. हरचंदपूर स्टेशनपासून ५० मीटर अंतरावर ही घटना घडली आहे. या अपघातानंतर ताबतोब रेल्वे प्रशासन मदत कार्यासाठी घटनास्थळावर पोहचले. डब्यामध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या अपघातामध्ये ७ प्रवाशांचा मृत्यू तर ३५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

हे नक्की वाचा – उत्तरप्रदेशात रेल्वे अपघातांमध्ये २५० प्रवाशांचा मृत्यू


हेल्पलाईन नंबर जारी

अपघातानंतर मदत कार्य करण्यासाठी प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. घटनास्थळावरील आप्तस्वकियांची चौकशी करण्यासाठी BSNL- 05412-254145, Railway- 027-73677, Patna Station – BSNL- 0612-2202290, 0612-2202291, 0612-220229, Railway Phone No.- 025-83288 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तातडीने मदत करण्याचे आदेश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळावर ताबडतोब फोन करुन परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच अपघातामध्ये जखमी झालेल्यांना लवकरात लवकर मदत करण्याचे आदेश दिले आहेत. लखनऊ आणि वाराणसीवरुन एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाली असून मदत कार्य सुरु आहे.

मदत जाहीर

उत्तरप्रदेश सरकारने न्यू फरक्का एक्स्प्रेस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे. तर या अपघातामध्ये जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

रेल्वे सेवेवर परिणाम

उत्तरप्रदेशमध्ये  न्यू फरक्का एक्स्प्रेसला झालेल्या अपघातामुळे रेल्वेसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. या अपघातानंतर रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. अपघातानंतर ५ एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या तर ९ एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -