Maharashtra Assembly Election 2024
घरक्रीडाRafael Nadal Retirement : लाल मातीच्या बादशहाची निवृत्ती

Rafael Nadal Retirement : लाल मातीच्या बादशहाची निवृत्ती

Subscribe

टेनिस जगताचा सुपरस्टार ‘राफेल नदाल’ याने टेनिसला अलविदा केला आहे. नदालने डेव्हिस चषकातील शेवटचा सामना मंगळवारी (19 नोव्हेंबर) नेदरलँड्सच्या बोटिक व्हॅन डी झिडशल्प याच्याविरुद्ध खेळला. या सामन्यात नदालला बोटिक व्हॅन डीने ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. सामन्याच्या दुसऱ्या सेटमध्ये नदालने दमदार पुनरागमन केले, पण अखेर त्याला पराभवाचा सामना करावा लागला. (Rafael Nadal Retirement)

अखेरच्या सामन्यात जरी त्याला अपयश आलं असलं तरी त्याच्या 24 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्याने मिळवलेल्या देदिप्यमान यशामुळे कोट्यवधी चाहत्यांनी त्याच्या या निरोपामुळे हळहळ व्यक्त केली आहे. त्याचा सामना सुरू असतानास स्टेडियममधील असंख्य चाहते ‘राफा राफा’ असा जयघोष करत होते. चाहत्यांनी नदालला त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याचा शेवटचा सामना सेंटर कोर्टवर पार पडला. आपल्या कारकिर्दीतील शेवटची लढत तो खेळत असल्यामुळे या प्रसंगी स्पेशल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या कारकिर्दीवर आधारित चित्रफित यादरम्यान प्रेक्षकांना दाखवण्यात आली. हा व्हिडीओ पाहून नदाल भावूक झाला, त्याचे डोळे पाणावले. त्याने प्रेक्षकांशी संवादही साधला, “टेनिस खेळून मी थकलेलो नाही पण आता शरीर साथ देत नाही. त्यामुळे येथेच थांबावे लागत आहे. माझ्या छंदाचे मी करिअरमध्ये रुपांतर करू शकलो आणि अपेक्षेपेक्षा जास्त काळ मला खेळता आले याचा आनंद आहे.” असे मत नदालने व्यक्त केले.

- Advertisement -

लाल मातीचा बादशहा :

फ्रेंच ओपनच्या रूपानं राफेल नदालनं २००५ साली आपल्या कारकिर्दीतले पहिलेवहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले होते. त्याने अंतिम फेरीतील अटीतटीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या मारियानो प्युर्तोचा ७-६(८-६), ३-६, १-६, ५-७) अशा फरकाने पराभव करून क्ले कोर्ट म्हणजेच लाल मातीच्या आखाड्याला सर्वात पहिल्यांदा आपलंस केलं. आणि ‘लाल मातीचा बादशहा’ म्हणून त्याला ओळखले जाऊ लागले.

फेडररचे नदालसाठी भावनिक पत्र :

राफेल नदालचा प्रतिस्पर्धी आणि मित्र म्हणून ओळखला जाणारा रॉजर फेडरर यानेही एक भावनिक पत्र लिहित नदालला त्याच्या निवृत्तीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. फेडरर आपल्या पत्रात म्हणाला, “मी जितक्या वेळ तुला पराभूत करू शकलो नाही त्यापेक्षा अधिक वेळा तू मला पराभूत केले आहेस. लाल मातीच्या कोर्टवर जेव्हा पाऊल ठेवायचो तेव्हा वाटायचं की मी तुझ्याच अंगणात पाऊल ठेवतोय. मला तू अधिक मेहनत करायला लावलीस. अगदी मला माझ्या रॅकेटची साईजही बदलावी लागली.” याआधी फेडररच्या निवृत्तीच्या सामन्यात जेव्हा फेडरर राफेल नदालच्या उपस्थितीत टेनिस कोर्टवर उतरला तेव्हा फेडररसोबतच नदालच्या डोळ्यातही अश्रू होते. यातूनच प्रतिस्पर्धी असूनही त्यांची मैत्री किती घट्ट होती हे लक्षात येते.

- Advertisement -

हेही वाचा : Rafael Nadal : लाल मातीचा बादशहा निरोप घेणार !


Edited By – Tanvi Gundaye

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -