घरताज्या घडामोडीरॅगिंगच्या घटनेने गुजरात हादरले, विद्यार्थ्यावर ३ तास अनैसर्गिक अत्याचार

रॅगिंगच्या घटनेने गुजरात हादरले, विद्यार्थ्यावर ३ तास अनैसर्गिक अत्याचार

Subscribe

गुजरातमधील एका खासगी विद्यापीठात रॅगिंगची अमानुष घटना घडली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. राजकोट येथील एका खासगी विद्यापीठात ही घटना घडली आहे. विद्यापीठातील पाच सीनियर विद्यार्थ्यांच्या टोळक्यानं रॅगिंगच्या नावाखाली एका ज्युनिअर विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. जवळपास ३ तास त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. या प्रकरणी कुवाडवा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी पीडित विद्यार्थ्याच्या गुप्तांगाला सॅनिटायझर लावून त्यात पेन्सिल आणि टूथब्रश टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आंघोळ करत असताना तीन विद्यार्थ्यांनी त्याचा व्हिडिओ काढला. त्यानंतर तो व्हिडिओ दाखवून ते त्याला ब्लॅकमेल करू लागले. आमचं म्हणणं मान्य केलं नाहीस तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी त्यांनी दिली. परंतु पीडित विद्यार्थ्यानं त्यांना नकार देत असं काही न करण्याची विनंती केली. मात्र, ते ऐकायला तयार नव्हते. तो ऐकत नसल्यानं त्यांनी बळजबरी सुरू केली. त्यांनी त्याचा मानसिक छळ करून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पाचपैकी तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पीडित विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून पुढील कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मोदी सरकारचा ‘रोजगार मेळावा’केवळ एक इव्हेंट, अतुल लोंढेंचा हल्लाबोल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -