Homeदेश-विदेशRaghuram Rajan : आपल्या देशात दोन भारत, एक चीनपेक्षा वेगाने पुढे, तर...

Raghuram Rajan : आपल्या देशात दोन भारत, एक चीनपेक्षा वेगाने पुढे, तर दुसरा…; वक्तव्य चर्चेत

Subscribe

जयपूर : राजस्थानच्या राजधानीत आजपासून प्रसिद्ध जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या 17 व्या आवृत्तीला आजपासून (1 फेब्रुवारी) आजपासून सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी या फेस्टिव्हलचे उद्घाटन केले. यानंतर फेस्टिव्हलच्या समोरच्या लॉनमध्ये गीतकार गुलजार यांचे पहिले सत्र होते. यानंतर आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी त्यांच्या सत्रात भारताच्या बेरोजगारीवर भाष्य केले. (In our country there are two Indias one is faster than China while the other India has to give food packets to 80 crore people Raghuram Rajan Statement in discussion)

हेही वाचा – Prakash Ambedkar : अंतरिम बजेटमध्ये फक्त ज्ञान सादर केले; आंबेडकरांचा मोदी सरकारला टोला

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात झाली आहे. याठिकाणी रघुराम राजन यांचे ‘बाल ओ पार’ हे नवीन पुस्तक अनबॉक्स करण्यात आले. यावेळी त्यांनी हलक्याफुलक्या स्वरात सांगितले की, आतापर्यंत मला सहन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यानंतर त्यांनी भारताच्या बेरोजगारीवर भाष्य करताना सध्याच्या राजकारणावर निशाणा साधला.

रघुराम राजन म्हणाले की, मोफत योजना आणि थेट लाभ दिल्याने राजकीय फायदा होतो, असे राजकीय पक्षांना वाटते. पण त्याऐवजी शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे. कारण सध्याच्या घडीला आपल्या देशात दोन भारत आहेत. यापैकी एक असा आहे जो चीनपेक्षा वेगाने पुढे जात आहे. तर दुसरा भारत असा आहे, जिथे 80 कोटी लोकांना अन्नाची पाकिटे द्यावी लागतात. त्यामुळे येणाऱ्या काळात भारताला कौशल्य, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रावर भर द्यावा लागेल.

हेही वाचा – Prakash Ambedkar : अंतरिम बजेटमध्ये फक्त ज्ञान सादर केले; आंबेडकरांचा मोदी सरकारला टोला

5 दिवस चालणार जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल 

जयपूरच्या क्लार्क्स आमेर हॉटेलमध्ये जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या 17 व्या आवृत्तीला आजपासून झाली आहे. 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी या कालावधीत चालणाऱ्या या 5 दिवसांच्या महोत्सवात 16 भारतीय आणि 8 आंतरराष्ट्रीय भाषांचे भाषक सहभागी झाले आहे. आज पहिल्याच दिवशी कवी आणि गीतकार गुलजार, माजी क्रिकेटपटू अजय जडेजा, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन, अरुंधती सुब्रमण्यम, शिवशंकर मेनन यांच्यासह अनेक विचारवंत वेगवेगळ्या सत्रात आपली मते मांडणार आहेत. महोत्सवात आसामी, अवधी, बंगाली, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कुरुख, मल्याळम, उडिया, पंजाबी, राजस्थानी, संस्कृत, तमिळ, तोडा, उर्दू आणि लमाणी या भारतीय भाषांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये सत्रांचे आयोजन केले जाईल.