राहत फतेह अली खानने आरोप फेटाळले

परकीय चलनाची तस्करी करण्याच्या आरोपा अंतर्गत ईडीने पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान याला नोटीस दिली होती. मात्र राहतने आरोप फेटाळत आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले आहे.

rahat fateh ali khan
पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान याला अंमलबजावणी संचलनालयाने (ED) नोटीस बजावली असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या होत्या. परकीय चलनाची तस्करी केल्यामुळे ईडीने त्याला नोटीस बजावली असल्याचे सांगण्यात आले. मात्र राहतने या आरोपांना फोटळले आहे. आपल्याला ईडीची अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे त्याने एका प्रेसनोटमध्ये म्हटलं आहे. आपण कोणत्याही प्रकारची तस्कारी केली नसल्याचे त्याने सांगितले आहे.

काय होता आरोप

ईडीने केलेल्या आरोपाअंतर्गत गायक राहत फतेह अली खान याच्याजवळ ३ लाख ४० हजार डॉलर्स (२.४२ कोटी रुपये) हे अवैध पद्धतीने आढळून आले. या पैशातील २ लाख २५ हजार डॉलर्सची (१.६ कोटी रुपये) खानने तस्करी केली आहे. या पैशाचा हिशोब देण्यासंदर्भात ईडीने नोटीस दिली होती. ईडीच्या या नोटीसनंतर राहतला उत्तर देणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्या जवळून ३ पट दंड आकारण्यात येणार असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय म्हणाला राहत

“जर कोणत्याही एजन्सीने मला नोटीस दिली असेल तर त्यांनी ती जाहीर करावी. मला नोटीस मिळाली तर त्याची कल्पना मला असती. मला ईडीकडून ही नोटीस मिळाली या बातमीने धक्का बसला आहे.” – राहत फतेह अली खान