Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Rahul Gandhi US Tour: इमिग्रेशनसाठी राहुल गांधींची २ तास वेटिंग, खासदारकीबाबत म्हणाले...

Rahul Gandhi US Tour: इमिग्रेशनसाठी राहुल गांधींची २ तास वेटिंग, खासदारकीबाबत म्हणाले…

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिकेच्या (Rahul Gandhi US Tour) दौऱ्यावर आहेत. सॅनफ्रान्सिकोमध्ये त्यांनी अमेरिकेतल्या भारतीयांशी चर्चा केली. तसंच अमेरिकेतल्या खासदारांनाही ते भेटणार आहेत. राहुल गांधी काल(मंगळवार) अमेरिकेला पोहोचले होते. सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर राहुल गांधींचं (Rahul Gandhi) स्वागत इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोडा आणि त्यांच्या सहाकाऱ्यांनी केलं. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी इमिग्रेशनच्या (immigration ) रांगेत २ तास उभे होते. त्यांना इमिग्रेशन क्लिअर होईपर्यंत दोन तास वाट बघावी लागल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

इमिग्रेशनसाठी राहुल गांधींची २ तास वेटिंग

इमिग्रेशनच्या रांगेत जेव्हा राहुल गांधी उभे होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या विमानात असलेल्या सहप्रवाशांसह सेल्फी काढले. तुम्ही रांगेत का उभे आहात? असा प्रश्न लोकांनी राहुल गांधींना विचारल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, मी आता खासदार नाही, सामान्य माणूस आहे. मला हे सगळं आवडतं, असं राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

राहुल गांधी स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर राहुल गांधी एक पत्रकार परिषदही घेणार आहेत. तसंच वॉशिंग्टन डीसी आणि थिंक टँकसह बैठकही करणार आहेत. सहा दिवसांचा हा दौरा असणार आहे. भारतीय अमेरिकन्सनाही संबोधित करण्याची शक्यता आहे. ४ जूनला न्यूयॉर्कमध्ये त्यांची एक सभा होईल आणि त्यानंतर या दौऱ्याचा समारोप होणार आहे.

राहुल गांधींची खासदारकी रद्द

मोदी या आडनावावरुन एक वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ मध्ये निवडणूक प्रचारा दरम्यान केलं होतं. यानंतर त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला. नंतर हे प्रकरण सुरत कोर्टात गेलं आणि सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली. खासदारकी गेल्यामुळे त्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्टही सरेंडर केला होता. तसेच दिल्ली उच्च न्यायालयात सामान्य पासपोर्ट मिळावा म्हणून अर्ज केला होता. जो अर्ज न्यायालयाने मंजूर केला.


हेही वाचा : राहुल गांधींना 3 वर्षांसाठी मिळणार नवीन पासपोर्ट; दिल्ली कोर्टाची परवानगी


 

- Advertisment -