(Rahul Gandhi about Priyanka Gandhi) नवी दिल्ली : लोकसभेत ‘भारतीय राज्यघटनेचा 75 वर्षांचा गौरवशाली प्रवास’ या विषयावरील चर्चा सुरू आहे. या चर्चेत काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी या सहभागी झाल्या असून त्यांनी आज, शुक्रवारी प्रथमच संसदेत भाषण केले. त्यांच्या या भाषणाचे कौतुक त्यांचे बंधू खासदार राहुल गांधी यांच्यासह शशी थरूर यांनी केले आहे. (Rahul Gandhi praises Priyanka Gandhi for her maiden speech)
लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान वायनाड येथील काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी प्रथमच भाषण करताना मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आपल्या 32 मिनिटांच्या भाषणात त्यांनी जात जनगणना, अदानी समस्या, देशाची एकता या मुद्द्यांसह देशातील भीतीच्या वातावरणाबाबत टिप्पणी केली. मोदी सरकारला लक्ष्य करताना त्यांनी, भ्याड लोकांच्या हाती फार काळ सत्ता राहात नाही, असेही सुनावले.
VIDEO | “I think it was an excellent maiden speech. She did not speak like a first time Parliamentarian. She spoke with tremendous maturity, grace and intelligence. I was very impressed. She also made all the important points. Since Rajnath Singh had a very strong speech… pic.twitter.com/JzEbMODUb6
— Press Trust of India (@PTI_News) December 13, 2024
प्रियंका गांधी यांच्या लोकसभेतील पहिल्या भाषणाचे त्यांचे बंधू तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कौतुक केले. प्रियंका गांधी यांचे हे पहिले भाषण खूपच चांगले होते. माझ्या पहिल्या भाषणापेक्षा चांगले होते, असेही म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
तर, काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही प्रियंका गांधी यांची प्रशंसा केली. प्रियंका गांधी यांचे हे उत्कृष्ट भाषण होते. संसदेत आपले पहिलेच भाषण त्या करत आहेत, असे वाटले नाही. त्यांना संसदेत येऊन केवळ 15 दिवस झाले आहेत, पण पूर्ण परिपक्वतेने, प्रतिभा दर्शवित आणि अतिशय बुद्धिमत्तेने त्यांनी आपले मुद्दे मांडले. हे पाहून मी खूप प्रभावित झालो, असे शशी थरूर यांनी सांगितले.
संसदेत त्यांनी आपले मत ठामपणे मांडले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेसच्या इतिहासाबाबत बऱ्याच टिप्पण्या केल्या होत्या. त्याला प्रियंका गांधी यांनी अगदी योग्य उत्तर दिले. भूतकाळावर बोलण्याऐवजी वर्तमानावर कधी बोलणार? असा थेट सवाल प्रियंका गांधी यांनी सरकारला केला, असे सांगून थरूर म्हणाले, आम्ही पाहत असलेले सर्व महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले. या देशातील संविधानाची स्थिती पाहून आम्ही त्रस्त आहोत आणि त्यांनी हे सर्व मुद्दे योग्य प्रकारे मांडले. (Rahul Gandhi about Priyanka Gandhi: Rahul Gandhi praises Priyanka Gandhi for her maiden speech)