Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश राहुल गांधींचे 'ते' कृत्य 'लोफर'सारखे - दत्तात्रय नाईक

राहुल गांधींचे ‘ते’ कृत्य ‘लोफर’सारखे – दत्तात्रय नाईक

Subscribe

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारल्यामुळे काही स्तरातुन टिका झाली तर काही स्तरातुन राहुल गांधींचे कौतुकही करण्यात आले पण भाजपचे प्रवक्ते दत्तात्रय नाईक यांनी मात्र राहुल गांधी यांच्यावर जोरदार टिका केली आहे. राहुल गांधींचे संसदेतले कृत्य म्हणजे लोफरपणाचे आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

कॉंग्रेसने भाजपवर अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर संसदेत यावर चर्चा चालु असताना एका प्रसंगाने संपुर्ण देश बुचकाळ्यात पडला. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारल्यामुळे काही स्तरातुन टिका झाली तर काही स्तरातुन राहुल गांधींचे कौतुकही करण्यात आले पण भाजपचे प्रवक्ते दत्तात्रय नाईक यांनी मात्र राहुल गांधी यांच्यावर जोरदार टिका केली आहे. पंतप्रधानांना मिठी मारल्यानंतर राहुल गांधी स्व:तच्या जागेवर जावुन बसले आणि त्यांनी डोळा मारला पण त्यांचे हे डोळा मारणे दत्तात्रय नाईक यांना चांगलेच भोवले. राहुल गांधींनी ज्याप्रमाणे डोळा मारला ते ‘लोफरपणाचे’ लक्षण आहे. अशी टिका त्यांनी केलेली आहे.

पंतप्रधानांवर टिका आणि मग मिठी

राहुल गांधी यांनी संसदेत पंतप्रधान मोदिंवर कडकडून टिका केली आणि भाषणाचा समारोप करताच पंतप्रधानांना मिठी मारली होती. पण भाजप प्रवक्ते दत्तात्रय नाईक यांनी हाच मुद्दा उचलुन राहुल गांधी यांना टार्गेट केले आहे. डोळा मारणे हे लोफरचे काम आहे जे आतापर्यंत कॉलेजमध्ये मुलींवर लोफर करताना ऐकले होते पण संसदेत राहुल गांधी जे कृत्य केले आहे ते देशातल्या जनतेला अपेक्षित न्हवते असा टोला नाईक यांनी लगावला आहे.

मनोहर पर्रीकर यांच्यावरही टिका

- Advertisement -

कॉंग्रेस पक्ष हा गांधी कुटूंबियांच्या हातातील बाहुले बनलेला आहे असाही टोला त्यांनी यावेळी लगावला. गोवा कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख गिरीष चांदोरकर यांनी मनोहर पर्रीकर यांच्यावर टिका केली होती मनोहर पर्रीकर म्हणजे आघाडी सरकारच्या ईशाऱ्यावर नाचणारे बाहुले आहे अशी टिका त्यांनी केली होती यानंतर लगेचच दत्तात्रय नाईक यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -