लडाख : कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी सध्या लेह लडाखच्या दौऱ्यावर असून, त्यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त लडाखमधील पॅंगॉन्ग तलावाच्या काठावर श्रद्धांजली वाहिली. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर चीनने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीवरून निशाणा साधला. चीनने केलेल्या घुसखोरीच्या वक्तव्यावरुन देशात सध्या चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे.(Rahul Gandhi again targets the central government over Chinas intrusion Said this is a matter of concern)
#WATCH | “There were so many complaints from the people of Ladakh, they are not happy with the status that has been given to them, they want representation and there is a problem of unemployment…people are saying that the state should not be run by bureaucracy but state must be… pic.twitter.com/bymmXRci1H
— ANI (@ANI) August 20, 2023
राजीव गांधी यांनी श्रद्धांजली वाहल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली आहे. स्थानिकांच्या जमिनीवर कब्जा केला आहे. पुढे राहुल गांधी म्हणाले की, येथील स्थानिक लोक म्हणतात की, चिनी सैन्य आमच्या सीमेत घुसले आहे. चीनने आमच्या जमिनीवर कब्जा केल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, एक इंच जागासुद्धा चीनने बळकावली नाही, मात्र हे खरे नसून, येथील लोकांच्या म्हणण्यानुसार, चीनने आपल्या देशात घुसखोरी केल्याचेही राहुल गांधी यांनी म्हणाले.
हेही वाचा : Ladakh Accident : लडाखमध्ये लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; 9 भारतीय जवानांचा मृत्यू
लडाखमधील नागरिक नाराज
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, लडाखच्या लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांना जो दर्जा देण्यात आला आहे त्यावर ते खूश नाहीत. त्यांना प्रतिनिधित्व हवे आहे आणि त्यांच्यासमोर बेरोजगारीचा प्रश्न आहे. राज्य नोकरशाहीने चालवू नये, तर जनतेच्या आवाजाने राज्य चालवले पाहिजे, असे लोक म्हणत आहेत. येथील लोकांचे म्हणणे आहे की, चिनी सैन्य या भागात घुसले असून, त्यांची चराईची जमीन हिसकावून घेण्यात आली आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एक इंचही जमीन घेतली नाही. सत्य काय आहे हे तुम्ही इथे कोणालाही विचारू शकता असे म्हणत राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा : सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी परिणामांना सामोरे जाण्याचीही तयारी ठेवावी – सर्वोच्च न्यायालय
राहुल गांधी यांचे वक्तव्य चुकीचे
खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संरक्षण तज्ज्ञ संजय कुलकर्णी यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अशी विधाने करणे चुकीचे असून, चर्चा सुरू असताना कोणीही वक्तव्य करू नये. डेमचोक आणि डेपसांग हे दोन घर्षण बिंदू असल्यामुळे चर्चा सुरू आहे. इथेच गस्त घालण्यावर निर्बंध घातले जात आहेत, पण आम्ही हरलो असे म्हणणे चुकीचे ठरेल.