Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्राच्या चुकीच्या निर्णयामुळे ५० लाख लोकांचा मृत्यू, राहुल गांधींचा...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्राच्या चुकीच्या निर्णयामुळे ५० लाख लोकांचा मृत्यू, राहुल गांधींचा आरोप

ऑक्सिजनची कमतरता नव्हती तर संवेदनशीलता आणि खरेपणाची मोठी कमतरता होती.

Related Story

- Advertisement -

कोरोना संकटात देशात उद्भवलेल्या परिस्थितीवरुन काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेमध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे देशात ५० लाख लोकांचा मृत्यू झाला असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशातील कोरोना परिस्थिती भयानक झाली होती. या काळात केंद्र सरकारने चुकीचे निर्णय आणि उपाययोजना केल्या असल्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू झाली असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. काँग्रेसने कोरोना काळात वारंवार मोदी सरकारचा पत्राद्वारे सुचना देण्याचाही प्रयत्न केला होता.

काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, सत्य हेच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भारत सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे ५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेकांची बहीण, भाऊ, आई-वडीलांचा समावेश आहे. अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

- Advertisement -

कोरोना काळात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांवर आणि उपाययोजनांवर राहुल गांधी यांनी नेहमीच निशाणा साधला आहे. यापुर्वी राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला होता की, ज्यांनी आपल्या निकटवर्तीयांना गमावले आहे त्यांच्या डोळ्यांतील अश्रुंमध्ये सगळं लक्षात ठेवलं आहे. तसेच केंद्र सरकारने ऑक्सिजनमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे सांगितल्यावर ट्विट करत म्हटलंय की, फक्त ऑक्सिजनची कमतरता नव्हती तर संवेदनशीलता आणि खरेपणाची मोठी कमतरता होती. तेव्हापण होती आणि आताही आहे. अशी खोचक प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्यसभेत मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा लपवला असल्याचा आरोप केंद्र सरकारवर विरोधकांनी केला आहे. या आरोपावर आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी उत्तर देत हे आरोप फेटाळले आहे. मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या संकटामध्ये राजकारण करण्यात आले नाही. ज्या राज्यांनी कोरोनाच्या संकटात उत्तम कामगिरी केली आहे त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रशंसा केली आहे. यामध्ये त्या राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार आहे हे बघितले नाही असे प्रत्युत्तर मनसुख मांडवीय यांनी दिले आहे.

कोरोना मृत्यूचा आकडा लपवण्याचा आरोप फेटाळत आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे की, राज्य सरकारने जेव्हा जेव्हा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी केंद्र सरकारने दिली. राज्य सरकारने स्वतंत्र कोरोना लसीच्या डोसची खरेदी करण्याची परवानगी मागितील केंद्राकडून देण्यात आली. राज्य सरकार स्वतः टेंडर काढून लसीच्या डोसची कंपनीकडून खरेदी करत होती तेव्हाही केंद्र सरकारने कोणताच हस्तक्षेप केला नाही अशी माहिती मनसुख मांडवीय यांनी संसदेत दिली आहे.

- Advertisement -