‘त्या पार्टीत’ राहुल गांधींबरोबर होते ज्योतिरादित्य सिंधिया, काय आहे फोटो मागचे सत्य?

काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेपाळ दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी नेपाळमधील एका क्लबमधून त्यांचा एक व्हिडोओ व्हायरल झाला होता. मात्र, त्यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच हा फोटो सोशल मीडियावर युझर्सकडून मोठ्या प्रमाणात ट्विट केला जात आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत ज्योतिरादित्य सिंधिया देखील आहेत.

हा फोटो नेमका कोणता?

वास्तविक, काँग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर काही यूजर्स हा फोटो नेपाळचा असल्याचे सांगत आहेत. ज्योतिष एचएम नावाच्या युझर्सने हा फोटो ट्विट केलाय आणि म्हटले की, नेपाळमध्ये राहुल गांधी जिथे गेले होते, तिथे सिंधियाही लग्नाला गेले आहेत. मात्र, भाजपकडून चर्चांना उधाण आलंय.

फोटोत काय आहे?

या फोटोमध्ये सिंधिया राहुल गांधींसोबत दिसत आहेत. काही महिला मोबाईलमधून राहुलचा फोटो काढताना दिसत आहेत. त्याचवेळी सिंधिया राहुलच्या उजव्या बाजूला उभे असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने नेपाळमधील एका क्लबमध्ये राहुल गांधींचा व्हिडिओ ट्विट करून त्यांच्यावर हल्लाबोल केला होता.

काय आहे फोटो मागचे सत्य?

सिंधियांचा राहुल गांधींसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हा फोटो २०११चा आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री शिंदे यांच्यासोबत दिसत आहेत. वास्तविकता, राहुलने भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या लग्नानंतरच्या सोहळ्याला हजेरी लावली होती. वांगचुकने त्यांच्या बालपणीची मैत्रिण जेजेत्सुन पेमासोबत लग्न केलं होतं. राहुल गांधी त्यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस होते, तर सिंधिया UPA-II सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री होते. सध्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये सिंधिया केंद्रीय मंत्री आहेत.


हेही वाचा : छत्रपतींच्या गादीचा अवमान करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?, पुण्यात मराठा समाज आक्रमक