घरदेश-विदेशराहुल गांधी आणि स्मृती ईराणी यांच्यात ट्विटर युद्ध

राहुल गांधी आणि स्मृती ईराणी यांच्यात ट्विटर युद्ध

Subscribe

सोहराबुद्दीन शेख कथित एन्काउंटरप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यात ट्विटरयुध्द झाले. राहुल यांनी अमित शाहवर हल्लाकेल्याबद्दल ईराणी यांनी प्रतिहल्ला केला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यात ट्विटरवर एक नवे युध्द सुरु झाले आहे. सोहराबुद्दीन शेख एन्काउंटरप्रकरणी राहुल गांधी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर ट्विटरद्वारे टिका केली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. अमित शाह अध्यक्ष होणे, हे भाजपसाठी योग्य नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.

सोहराबुद्दीन एन्काउंटरप्रकरणी अमित शाह हे मुख्य सुत्रधार आहेत, असे सीबीआयचे मुख्य तपास अधिकारी संदिप तामगाडगे यांनी सांगितले होते. यावर राहुल गांधी यांनी ट्विट केले. “गीतेमध्ये लिहिले आहे की तुम्ही सत्यापासून लांब पळू शकत नाहीत. संदिप तामगाडगे यांनी अमित शाह यांना मुख्य सुत्रधार म्हटले आहे. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष म्हणून अमित शाह पदावर असणे योग्य नाही.” त्यामुळे अमित शाह सत्यापासून पळू शकत नाही, अशी टिका राहुल यांनी केली आहे.

- Advertisement -

राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना स्मृती ईराणी ट्विटरवर म्हणाल्या की, “२०१४ मध्ये अमित शाह यांना क्लिनचीट मिळाली होती.” राहुल यांना #JhoothKiMachine म्हणजेच असत्याची मशिन असल्याचे त्या म्हणाल्या. राजकीय हेतूने शाह यांना फसवण्यात आले होते. हे न्यायालयाने ही स्पष्ट केले आहे. युपीएच्या शासनात हे कुणाच्या आदेशावरून करण्यात आले होते, असा जाब त्यांनी राहुल गांधीकडे मागितला. “मी निश्चितपणे सांगू शकते की राहुल गांधी यांनी गीता कधी वाचलीच नसणार”, असेही ईराणी यांनी ट्विटरवर व्यक्त केले.

- Advertisement -

सोशल मीडियावर सुरू झालेला हा वाद आता कुठवर जातो याकडे नेटिझन्सचे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -