घरदेश-विदेशमोदींच्या यो दोन योजना राहुल गांधींनाही भावल्या, यूकेमध्ये केली स्तुती

मोदींच्या यो दोन योजना राहुल गांधींनाही भावल्या, यूकेमध्ये केली स्तुती

Subscribe

केंब्रिज विद्यापीठात बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांना राहुल गांधी यांनी मार्गदर्शन केले. तेथे त्यांना काही प्रश्नही विचारण्यात आले. जनतेला फायदा झाला अशा मोदी सरकारच्या धोरणांबाबत तुम्ही काय सांगाल या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, उज्ज्वला योजने अंतर्गत महिलांना मोफत सिलिंडर देणे आणि नागरिकांचे बॅंक खाते उघडणे या दोन चांगल्या योजना आहेत.

नवी दिल्लीः कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या दोन योजना भावल्या आहेत. या दोन योजनांचे राहुल गांधी यांनी परदेशात कौतुकही केले आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या योजनांचे कौतुक केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

केंब्रिज विद्यापीठात बिझनेस स्कूलच्या विद्यार्थ्यांना राहुल गांधी यांनी मार्गदर्शन केले. तेथे त्यांना काही प्रश्नही विचारण्यात आले. जनतेला फायदा झाला अशा मोदी सरकारच्या धोरणांबाबत तुम्ही काय सांगाल या प्रश्नाचे उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, उज्ज्वला योजने अंतर्गत महिलांना मोफत सिलिंडर देणे आणि नागरिकांचे बॅंक खाते उघडणे या दोन चांगल्या योजना आहेत.

- Advertisement -

या दोन योजनांचे कौतुक करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणाही साधला. भारतात माध्यमे आणि न्यायव्यवस्था सरकारच्या नियंत्रणात आहे. माझ्या फोनवर पेगासस सॉफ्टवेअर होते, ज्याद्वारे माझी हेरगिरी करण्यात आली. तुमचा फोन रेकॉर्ड होत असल्याचे गुप्तचर अधिकाऱ्यांनी मला सांगितले. तसेच विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर गुन्हे आहेत, माझ्यावरही गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकरणात गुन्हे दाखल आहेत, जे आम्ही कधी केलेच नाहीत. त्यामुळे आम्ही स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

पुढे राहुल गांधी म्हणाले, लोकशाही मूल्यांशी जे जोडले गेले नाही, असे जग निर्माण होत असल्याचे आपण पाहू शकत नाही. जगात लोकशाही मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या विचारांची गरज आहे, त्यामुळे ते तुम्ही कोणावरही लादू शकत नाही. काश्मीर गेल्या अनेक वर्षांपासून हिंसाचाराने ग्रासले आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने मला तिथे न जाण्याचा इशारा दिला होता, पण भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये पोहोचल्यावर हजारो लोक तिरंगा घेऊन पुढे आले.

- Advertisement -

काश्मिरमध्ये एक व्यक्ती माझ्याजवळ आली, तिने काही मुलांकडे हात दाखवून सांगितले की, ते अतिरेकी आहेत. ती मुले माझ्याकडे एकटक पाहत होती, पण ती काहीच करू शकली नाहीत. लोकांचे ऐकण्याची आणि अहिंसेची ही ताकद असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -