घरताज्या घडामोडीपंतप्रधानांच्या 'मन की बात'वर राहुल गांधी म्हणाले

पंतप्रधानांच्या ‘मन की बात’वर राहुल गांधी म्हणाले

Subscribe

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमावर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही सवाल उपस्थित केले होते. त्यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती. त्यानंतर आज पुन्हा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावर निशाणा साधला आहे. राष्ट्ररक्षण आणि सुरक्षेची ‘बात’ कधी होणार, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत विचारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओवरील कार्यक्रमात देशातील जनतेला संबोधित केले. त्यावर राहुल गांधीने मोदींना ट्विट करत टिप्पणी केली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

कोरोना विषाणूचा संसर्ग तीव्र गतीने होत असून देशातील नव्या भागांमध्ये देखील हा संसर्ग पसरत चालला आहे. मात्र, भारत सरकाकडे या साथीच्या आजारावर मात करण्यासाठी कोणतीही योजना नाही. तसेच पंतप्रधानांनी मौन धारण केले आहे. त्यांनी कोरोना साथीपुढे शरणागती पत्करली आहे आणि कोरोनाशी लढण्यास नकार दिला आहे, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या पाच लाखांहून अधिक झालेली असताना राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकारला जोरदार हल्लाबोल करत ट्विटद्वारे विविध प्रश्न विचारत आहेत. काही दिवसांपूर्वी लडाखमधील गलवान खोऱ्यातील हिंसक हल्लात भारताने २० जवान शहीद झाले. तेव्हापासून परिस्थिती तणावपूर्ण आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणाले की, ‘पंतप्रधानांनी न घाबरता सत्य सांगावं की चीनने जमीन घेतली आहे आणि आपण कारवाई करण्यासाठी जात आहोत. अशा परिस्थितीत संपूर्ण देश आपल्या पाठीशी उभा आहे.’ तसेच भारत-चीन सैनिकांमध्ये पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत, अशीही टीका राहुल गांधींनी केली होती. राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत. ‘नरेंद्र मोदी हे वास्तवात सरेंडर मोदी आहेत,’ असं ट्विट करत मोदींवर टिकास्त्र सोडलं होते.


हेही वाचा – आत्मनिर्भर भारत हेच भारताचे लक्ष – पंतप्रधान नरेंद्र मोदी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -