अहंकार आणि हुकूमशाहीवर सत्याचा विजय होईल, राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सोनिया गांधी केंद्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात दाखल झाल्या असून त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीच्या निषेधार्थ देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी दिल्ली पोलिसांना ताब्यात घेतले आहे. या सगळ्यात काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी ट्विट करत जीएसटीवरून टीका केली आहे. जीएसटीवर चर्चा – सभागृह तहकूब, महागाईवर चर्चा – सभागृह तहकूब, अग्निपथवर चर्चा – सभागृह तहकूब, एजन्सींच्या गैरवापरावर चर्चा – सभागृह तहकूब, आज जाहीरपणे, देशातील जनतेचा आवाज दाबला जात आहे. या अहंकार आणि हुकूमशाहीवर सत्याचा विजय होईल, असं ट्विट करत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहोत. लोकशाहीत एजन्सीचा गैरवापर होत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही अहिंसक आंदोलन करत आहोत, तो आमचा हक्क आहे. आमचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. लोकशाहीत विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे, असं काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : दुर्मीळ योगायोग! आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी भारताला मिळाल्या होत्या पहिल्या महिला राष्ट्रपती