नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्वीटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशातील पेपर फुटीवरुन राहुल गांधींनी एक व्हिडीओ ट्वीट करत म्हटले आहे, की लखनऊ ते प्रयागराज पर्यंत पोलीस भरती पेपरफुटीच्या मुद्यावर तरुण रस्त्यावर उतरले आहेत. आणि तिथून अवघ्या 100 किलोमीटरवर वाराणसीतून पंतप्रधान तरुणांच्या नावावर तरुणांचीच दिशाभूल करत आहेत. वाराणसीच्याच अंदाजात सांगायचे तर, ”मोदी जी ‘नानी को ननिहाल का हाल सुना रहे हैं”
पंतप्रधानांचा राहुल गांधींवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता. ‘काशीचे तरुण व्यसनाधीन आहे. काशीतील तरुणांना अमली पदार्थांचे व्यसनी म्हणून संबोधित केले आहे,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर केली होती.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेसचे युवराज म्हणतात की, काशीचे तरुण व्यसनाधीन असून माझ्या काशीतील तरुणांना अमली पदार्थांचे व्यसनी म्हणून संबोधित केले. यामुळे राहुल गांधीचा चेहरा समोर आला आहे. अयोध्या आणि काशीचे बदलले स्वरुप हे त्यांच्या रागाचे मुख्य कारण आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी राहुल गांधीवर केली.
लखनऊ से लेकर प्रयागराज तक पुलिस भर्ती पेपर लीक को लेकर युवा सड़कों पर हैं।
और वहां से मात्र 100 किमी दूर वाराणसी में प्रधानमंत्री युवाओं के नाम पर युवाओं को ही बरगला रहे हैं।
ठेठ बनारसी अंदाज में कहें तो मोदी जी ‘नानी को ननिहाल का हाल सुना रहे हैं’। pic.twitter.com/rjnrdu2ViQ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 23, 2024
काय म्हणाले होते, राहुल गांधी
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. यात्रा उत्तर प्रदेशमध्ये असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले होते, मी वाराणसीला गेलो होतो. तिथे बघितले, रात्रीच्या वेळी वाद्य वाजत आहेत. दारु पिऊन उत्तर प्रदेशचे भविष्य रस्त्यावर नाचत आहे, तर कुठे रस्त्यावर पडले आहे. दुसरीकडे आपल्याला राम मंदिरात नरेंद्र मोदी दिसतील, अदानी, अंबानी दिसतील. भारतातील अब्जाधीश दिसतील. मात्र तिथे दलित, आदिवासी, मागास कोणीही दिसणार नाही. ती तुमची जागा नाही. तुमची जागा इथे रस्त्यावर भीक मागण्याची आहे. त्यांचे काम पैसे मोजायचे आहे.’
हेही वाचा : PM Modi : अयोध्या, काशीचा विकास बघितल्यामुळे राहुल गांधी नाराज – मोदी