Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी हाथरस, गुजरात बलात्कारांच्या घटनांचा दाखला देत राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

हाथरस, गुजरात बलात्कारांच्या घटनांचा दाखला देत राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल

Subscribe

बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या ११ कैद्यांची सुटका करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांनी ट्विट करत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत भाजपला दुय्यम मानसिकतेचा पक्ष म्हटले आहे. उन्नावमध्ये भाजप आमदाराला वाचवण्याचे काम, कठुआमध्ये बलात्कार्‍यांच्या समर्थनार्थ रॅली, हाथरस – सरकार बलात्काऱ्यांच्या बाजूने, गुजरात – बलात्कार्‍यांची सुटका आणि सन्मान. गुन्हेगारांना पाठिशी घालणे हे भाजपची महिलांप्रती असलेली दुय्यम मानसिकता दर्शवते. अशा राजकारणावर पंतप्रधानांना लाज वाटत नाही का?, असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

गुजरातमधील गोध्रा ट्रेन आगीच्या घटनेनंतर जातीय हिंसाचारात मार्च २००२ मध्ये गर्भवती बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता. या हिंसाचारात त्यांच्या कुटुंबातील ७ जणांचाही मृत्यू झाला होता. कुटुंबातील इतर ६ सदस्य कसेतरी पळून जाण्यात यशस्वी झाल्याने त्यांचे प्राण वाचले. हे दोषी २००२ मध्ये बिल्कीस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. त्यांची आता सुटका करण्यात आली आहे.


हेही वाचा : चीनला टक्कर देण्यासाठी तैवानकडून लढाऊ विमान सज्ज, जाणून घ्या फायर पॉवर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -