भुतानमध्ये चीनकडून करण्यात आलेल्या घुसखोरीवर राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

rahul gandhi slam modi govt on agriculture laws

भारत आणि चीन यांच्यातील तणावाचं वातावरण कायम आहे. कारण भारताजवळील सीमेवर चीनच्या कुरापती दिवसागणिक वाढ आहेत. परंतु या पार्श्वभूमिवर आणि चीनने भुतानमध्ये केलेल्या घुसखोरीवर काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारने प्रथम आमची जमीन चीनला समर्पित केली आणि आता चीनला मागे घेण्याच्या निष्क्रीयतेमुळे आमच्या शेजारच्या देशांना धोक्यात आणत आहात, अशा प्रकारचे गंभीर आरोप राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केले आहेत.

ट्विटच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा

राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून मोदी सरकार निशाणा साधला आहे. मोदी सरकारने प्रथम आमची जमीन चीनला समर्पित केली आणि आता चीनला मागे घेण्याच्या निष्क्रीयतेमुळे आमच्या शेजारच्या देशांना धोक्यात आणत आहात.जर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी उभे राहू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या मित्रांसाठी कसे उभे राहाल?, असा प्रश्न राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

भुतानमध्ये बेकायदेशीर गावांची निर्मिती

चीन भुतानमध्ये बेकायदेशीर गावांची निर्मिती करत आहे. भारत-चीन सीमेवरील तणावावर त्यांनी मतं मांडली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चीन भुतानमधील प्रदेशात बेकायदेशीररित्या ट्रायजंक्शन डोकलाम पठारापासून ३० किमीपेक्षा कमी अंतरावर गावांची निर्मिती करत आहे. या गावांचा वापर चीनकडून लष्करी आणि नागरीक अशा दोन्ही कामांसाठी केला जाण्याची शक्यता आहे. ३६० द्वारे अमेरिकन डेटाने जारी केलेल्या माहितीनुसार, भूतानच्या पश्चिम सीमेवरील काही ठिकाणी बांधकामाशी संबंधित हालचाली २०२० च्या सुरुवातीपासून सुरू आहेत.

दरम्यान, भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यात तणावाचं वातावरण असताना चीनने नेपाळच्या १५० हेक्टरचा भूभागावर ताबा मिळवला होता. तसेच याची सुरूवात देखील चीनने २०२० मध्ये केली होती. २०२० मे महिन्यात चीनने नेपाळचा हा भूभाग बळकावण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आपले लष्कर देखील या भागात तैनात केले होते.


हेही वाचा : Weather Today: उत्तर भारतात धुक्याच्या चादरीसह थंडीचा कहर, ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, जाणून घ्या