Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश कधीतरी 'खर्चा पर भी चर्चा' होऊ द्या; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

कधीतरी ‘खर्चा पर भी चर्चा’ होऊ द्या; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

Related Story

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत लक्षणीय घसरण झाल्यानंतर देखील देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झालेल्या दिसत नाही, याच मुद्द्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. तेलाच्या किंमतींसंदर्भात राहुल गांधी म्हणाले, केंद्र सरकारच्या कर वसुलीमुळे गाडीत पेट्रोल डिझेल भरणे हे एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नाही, असे असले तरी पंतप्रधान मोदी त्यावर चर्चा का करत नाहीत? कधी तरी ‘खर्चा पर भी चर्चा’ होऊन जाऊ द्या, असे म्हणत गुरूवारी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात राहुल गांधी यांनी गुरूवारी एक ट्वीट देखील केले. या ट्वीटमध्ये त्यांनी असे म्हटले की, ”केंद्र सरकारच्या कर वसुलीमुळे गाडीत पेट्रोल डिझेल भरणे हे एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नाही. तरी पंतप्रधान या विषयी कोणतीही चर्चा का करत नाही? खर्चा वर देखील चर्चा करा!”

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ८ दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. मात्र, भारतात तेलाच्या किंमतीत कोणतीही कपात बघायला मिळत नाही, अशी बातमी एका वृत्तसंस्थेने दिल्यानंतर राहुल गांधी यांनी हे ट्वीट केले आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोजी यांनी ७ एप्रिल २०२१ रोजी विद्यार्थ्यांसह शिक्षकांशी (परीक्षा पर चर्चा) परीक्षेसंदर्भात संवाद साधला. परीक्षा पर चर्चा २०२१ या कार्यक्रमांतर्गत साधारण ९६ मिनिटं साधलेल्या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याचा मंत्र देखील दिला. दरम्यान, आज सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. तर आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या मंगळवारी पेट्रोल २२ पैसे आणि डिझेल २३ पैशांनी स्वस्त झाले होते. परंतु देशात तेलाची किंमत आजही जास्त असल्याने नागरिक हैरान आहेत. मुंबईत पेट्रोलची किंमत ९६.९८ रुपये प्रति लीटर तर डिझेलची किंमत ८७.९६ रुपये प्रति लीटर आहे.


- Advertisement -