Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश कोरोना लसीकरणाचा तुटवडा गंभीर समस्या, कोणताही 'उत्सव' नाही; राहुल गांधींची मोदींवर टीका

कोरोना लसीकरणाचा तुटवडा गंभीर समस्या, कोणताही ‘उत्सव’ नाही; राहुल गांधींची मोदींवर टीका

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरु असून देशभरात गेल्या २४ तासात १ लाख ३१ हजार ९६८ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा १ कोटी ३० लाख ६० हजार ५४२ वर पोहोचला आहे. त्यामुळे देशाची चिंता पुन्हा एकदा अधिक वाढल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत कोरोना लसीकरण मोहीम देखील तितक्याच वेगाने सुरू आहे. मात्र देशात बऱ्याच राज्यात कोरोना लसींचा तुटवडा भासत असल्याने नागरिकांना लस न घेताच लसीकरण केंद्रावरून माघारी यावे लागत असल्याचे चित्र काही राज्यात बघायला मिळतंय. कोरोना लसीचा तुटवडा भासत असताना या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी असे ट्वीट केले की, आपल्या नागरिकांचा जीव धोक्यात घालून लसींचं एक्सपोर्ट करणं योग्य आहे का? कोरोना लसींचा तुटवडा भासणं ही एक गंभीर समस्या असून तो कोणताही उत्सव नाही, असेही म्हटले आहे.

असं म्हणाले राहुल गांधी…

‘वाढत्या कोरोना संकटादरम्यान लसींची कमतरता भासणं ही चिंताजनक समस्या आहे. तर कोणताही उत्सव नाही. आपल्या नागरिकांचा जीव धोक्यात टाकून कोरोना लसींचं एक्सपोर्ट करणं योग्य आहे का? केंद्र सरकारने सर्व राज्यांना कोणत्याही भेदभावाशिवाय मदत करावी. आपल्याला सर्वांना एकत्र येऊन या महामारीला हरवायचं आहे.’, असं ट्वीट राहुल गांधींनी करत केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.

- Advertisement -

दरम्यान, कित्येक राज्यांनी केंद्र सरकारवर भेदभाव करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासोबतच कोरोना लसींचा तुटवडा भासत असल्याने काही राज्यातील कोरोना लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत साधारण १ कोटी ६१ लाखांहून अधिक कोरोना लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. यापैकी ९१ लाख १८ हजार ३५० लसींचा वापर करण्यात आला आहे. तर आता राज्यात केवळ १५ लाख ८४० इतक्याच लसीचा साठा असल्याचे सांगितले जात आहे. यासह वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, महाराष्ट्राप्रमाणेच ओडीसा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांची परिस्थिती देखील तितकीच चिंताजनक आहे.


- Advertisement -