घरताज्या घडामोडीराजीव कोरोनातून बाहेर पडेल वाटले होते, राहुल गांधी गहिवरले

राजीव कोरोनातून बाहेर पडेल वाटले होते, राहुल गांधी गहिवरले

Subscribe

राजीव आपल्यात नाही याबाबतचा विश्वासच बसत नाही

राजीव आमचा होता. मी विचार केला होता की राजीव या कोरोनाविरोधातील लढाईतून बाहेर पडेल. राजीव हॉस्पिटलमध्ये असताना डॉक्टरांशी बोललो, मॅसेज केले, कॉल केले. मला तब्येतीबाबत उत्तर येत गेली. पण राजीव आज आपल्यात नाही, याबाबत विश्वासच वाटत नाही, असे सांगताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना गहिवरून आले. खरच आज दुःखाचा दिवस आहे. आज कॉंग्रेस पक्षाची क्षमता राजीवच्या निमित्ताने आम्ही हरवली अशी आमची भावना आहे. राजीवजी यांनी तरूणाईला, युथ कॉंग्रेसला, कॉंग्रेस नेत्यांना जी दिशा दिली आहे, त्याच मार्गावर आम्ही यापुढे नक्कीच चालणार असेही राहुल गांधी म्हणाले. त्याचवेळी राजीव सातव यांच्या परिवारासोबत आम्ही नेहमीच उभे राहू असेही त्यांनी सांगितले. स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या श्रद्धांजली सभेच्या निमित्ताने ते बोलत होते.
जेव्हा राजकारणात नेता पुढे जातो, तेव्हा त्या नेत्याची घमंड वाढते. कारण तो नेता पॉवरफुल्ल झालेला असतो. पण राजीवजींच्या बाबतीत मात्र अस घडल नाही, याचा परिवाराला गर्व असायला हवा. राजीवची युथ कॉंग्रेसपासूनची कारकीर्द मी पाहिली आहे. कोणाबद्दलही चुकीचे बोलायचे नाही, कोणाच्या मागूनही त्याच्याबद्दल वाईट बोलायचे नाही हा राजीवचा एक चांगला गुण होता असे राहुल गांधी म्हणाले. अनेकदा त्यांच्याबद्दल इतर लोक वाईट बोलत आहेत, असे सांगून चाचपणी केल्यानंतरही त्यांनी कधीच कोणाबद्दल वाईट शब्द काढले नाहीत. युथ कॉंग्रेसपासूनच राजीवमध्ये मी चमक पाहिली होती. एक चांगली समज असलेला, प्रामाणिक स्वभाव असलेला राजीव मी दिवसेंदिवस विकसित होताना पाहिलेला आहे. अनेकदा युथ कॉंग्रेसमध्ये त्यांनी काम करताना काही चुकाही केल्या. पण त्या चुकांमध्ये सुधारणा करत त्याचे काम उत्तमोत्तम होत गेले. संसदेत काम करतानाही त्यांच्या स्वभावातील नेतृत्वगुण अधिक प्रगल्भ झालेला पहायला मिळाला. युथ कॉंग्रेसमध्ये जी इमॅच्युरीटी होती, ती पुढच्या काळात मागे पडत गेली असेही त्यांनी सांगितले. संसदेतील एक चांगला संसदपटू म्हणून राजीवची कामगिरी दिवसेंदिवस उंचावतच गेली. पक्षाता एक नवीन नेता तयार होताना मी समोर राजीवला पाहिलय. मी अनेकदा सांगायचो की हा तरूण नक्कीच देशासाठी काही ना काही करून दाखवणार.

संसदेतला घोषणांचा किस्सा

संसदेच्या आवारात आम्ही एकदा घोषणा देत होतो. खूपच कडक उन्हाळ्याचा दिवस होता. कुणीही सहज थकून जाईल इतक महाभयंकर तापमानाचा पारा होता. पण या घोषणांमध्ये सलग ४५ मिनिटे राजीव सातव काम करत होते. न थकता सलग ४५ मिनिटे घोषणा दिल्यानंतर आम्ही संसदेत गेलो. तेव्हा मी राजीवला विचारले इतक्या सलग ४५ मिनिटे घोषणा देताना थकवा आला नाही का ? तेव्हा राजीव म्हणाला की या लोकांसोबत लढण हेच माझे काम आहे. त्यावेळी मी वेणुगोपाल यांना सांगितले की घोषणा देणारे आपण कमी लोक नव्हतो, राजीव हाच एकाचवेळी १० जणांचे काम करायचा. त्यामुळेच राजीवच्या निमित्ताने एकाचवेळी १० जणांची काम करण्याचे बळ पक्षाला मिळायचे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -