घरदेश-विदेशराहुल गांधींची यात्रा आता जानव्यावरून ट्रोल; नेमकं काय घडलं?

राहुल गांधींची यात्रा आता जानव्यावरून ट्रोल; नेमकं काय घडलं?

Subscribe

जानवे डाव्या बाजूने उजवीकडे घालण्याची पद्धत आहे. फोटोतील मुलाने जानवे उजवीकडून डावीकडे घातले होते. नातलगाचा मृत्यू झाला तरच उजवीकडून डावीकडे जानवे घातले जाते. त्यामुळे या फोटोवरुन भारत जोडो यात्रा ट्रोल झाली.

नवी दिल्लीः खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जानव्यामुळे ट्रोल झाली आहे. सर्वच स्तरातून टीका झाल्यानंंतर काॅंग्रेसने माघार घेत यांसंदर्भातील फोटोच डिलिट केला. भाजपने मात्र त्या फोटोवर जोरदार हल्लाबोल केला.

कन्याकुमारीपासून सुरु झालेली खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता राजधानी दिल्लीत पोहोचली आहे. तेथून ती काश्मिरमध्ये जाणार आहे. तेथे राष्ट्रध्वज फडकवून या यात्रेची सांगता होणार आहे. या यात्रेत सर्वच क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले होते. अगदी अभिनेता कमल हसनही या यात्रेत सहभागी झाला होता. या यात्रेला अनेकांनी त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवलेले. आदिवासी पारंपारिक वेषात या यात्रेत सहभागी झाले होते. तुफान गर्दी होत असलेल्या भारत जोडो यात्रेने दोनवेळा रुग्णवाहिकेला जागा करुन दिली होती. त्यामुळे या यात्रेचे कौतुकही झाले होते.

- Advertisement -

चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र शासन कठाेर नियम करण्याच्या तयारीत होते. कोरोनाच्या नियमांचे पालन करा अथवा यात्रा थांबवा असे आदेश केंद्र शासनाने दिले होते. मात्र ही यात्रा थांबणार नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले होते. ही यात्रा सुरुच राहिली.

या यात्रेचे कौतुक करत काॅंग्रेस त्यांच्या ट्विटर हॅंडलवरुन यात्रेचे काही फोटो ट्विट करत असते. त्यातील अनेक फोटो सोशल मिडियावर ट्रोल झाले आहेत. त्यातील एक फोटो टीकेचा धनी झाला. या फोटोत एका लहान मुलाचा हात धरुन राहुल गांधी चालत आहेत. निरागस पावले सोबत असताना पावले कशी थांबणार, भारत जोडो यात्रेने संकटाच्या बेड्या तोडल्या आहेत, असे काॅंग्रेसने लिहिले होते. मात्र या फोटोतील मुलाने उलटे जानवे घातले होते. जानवे डाव्या बाजूने उजवीकडे घालण्याची पद्धत आहे. फोटोतील मुलाने जानवे उजवीकडून डावीकडे घातले होते. नातलगाचा मृत्यू झाला तरच उजवीकडून डावीकडे जानवे घातले जाते. त्यामुळे या फोटोवरुन भारत जोडो यात्रा ट्रोल झाली.

- Advertisement -

भाजप नेते तजिंदर पाल सिंह बग्गा म्हणाले, हा संकुचित राजकारणाचा भाग आहे. स्वार्थीय राजकारणासाठी ४ डिग्री तापमानात एका लहान मुलाला कपडे काढून फिरवायचे काम करण्यात आले आहे. अशाप्रकारे टीका झाल्यानंतर काॅंग्रेसने तो फोटो ट्विटर हॅंडलवरुन डिलिट केला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -