घरदेश-विदेशRahul Gandhi : 'भाजपाने दिवस मोजायला सुरुवात करावी', राहुल गांधींनी जातीय जनगणनेच्या...

Rahul Gandhi : ‘भाजपाने दिवस मोजायला सुरुवात करावी’, राहुल गांधींनी जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर साधला निशाणा

Subscribe

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी (3 फेब्रुवारी) देशातील जात जनगणनेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

Rahul Gandhi On Caste Census: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी (3 फेब्रुवारी) देशातील जात जनगणनेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, जर कोणीही मागासवर्गीय नाही, दलित नाही… तर मोदीजींनी इतकी वर्षे स्वत:ला ओबीसी (इतर मागासवर्गीय) का म्हणवून घेतले? (Rahul Gandhi BJP should start counting the days Rahul Gandhi targets PM over caste census issue)

काय म्हणाले राहुल गांधी?

जात जनगणनेच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “पंतप्रधान म्हणतात की, देशात दोनच जाती आहेत – श्रीमंत आणि गरीब. मग जर कोणी मागासलेला नाही, दलित नाही आणि आदिवासी नाही, तर मग मोदी इतकी वर्षे स्वतःला ओबीसी का म्हणवून घेतात? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

 राहुल गांधींनी पुढे लिहिले की, “सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी जात जनगणना केली जाणार आहे, दुर्बल आणि वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जात जनगणना केली जाईल, भाजपा सरकारने आता दिवस मोजायला सुरूवात करावी, आम्हीच जात गणना करणार, असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला.

जात जनगणनेवर भर देत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी (2 फेब्रुवारी) संसदेत म्हटले होते की, “आम्ही राजकारणासाठी दबाव आणत नाही.”

- Advertisement -

देशात जात जनगणना झाली, तर किती पदवीधर आहेत, किती नोकऱ्या आहेत आणि किती जमीन विविध समाजाच्या मालकीची आहे हे कळेल म्हणून, ही मागणी केली जात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. जात गणना झाली तर सरकारला त्याच्या आधारे धोरणे बनवणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे सरकारने यावर पुन्हा विचार करावा, असे काँग्रेस अध्यक्ष खर्गे म्हणाले होते.

आंध्र प्रदेश आणि बिहार सरकारने जातीवर आधारित सर्वेक्षण केलं

दुसरीकडे, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्य सरकारांनी यापूर्वीच जातीनिहाय सर्वेक्षण केले आहे. त्याचबरोबर रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणाच्या काँग्रेस सरकारनेही लवकरच जात जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जनतेला आश्वासन दिले होते की, ते सत्तेवर आल्यास राज्यात जात जनगणना करतील. तेलंगणा सरकारने आता  यासंदर्भात तयारी सुरू केली आहे. जात जनगणना सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याच्या अधिकृत सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा: CM Siddaramaiah : मुख्यमंत्री आहात म्हणून काय झाले? उच्च न्यायालयाने सिद्धरामय्यांना ठोठावला दंड )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -