घरताज्या घडामोडीराहुल गांधींचा शरद पवारांना बायपास, निमित्त सातवांच्या श्रद्धांजली सभेचे

राहुल गांधींचा शरद पवारांना बायपास, निमित्त सातवांच्या श्रद्धांजली सभेचे

Subscribe

कॉंग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या नुकत्याच झालेल्या निधनामुळे ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत राजीव सातव यांच्याविषयी बोलताना राहुल गांधी गहिवरल्याचे चित्रही पहायला मिळाले. राजीव सात यांच्याबद्दल बोलताना युवक कॉंग्रेसमधून सुरूवातीपासून ते संसदेतील तरूण नेता म्हणून कामगिरीचे राहुल गांधी यांनी भरभरून कौतुक केले खरे. पण या कौतुका दरम्यान राहुल गांधी यांनी राजीव सातव यांना राजकारणातील आदर्श असलेल्या व्यक्तीबाबतचाही उल्लेख सांगितला. पण त्याचवेळी या आदर्श व्यक्तीचे नाव ऑनलाईन सभेत न घेण्याचे राहुल गांधी सोयीस्कररीत्या टाळले. राजीव सातव यांच्यासमोर असलेल्या आदर्श व्यक्तीबद्दलचा उल्लेख करता करता राहुल गांधी थांबले, त्या व्यक्तीचे नाव न घेताच राहुल गांधी हे बोलत राहिले.

जेव्हा राजकारणात नेता पुढे जातो, तेव्हा त्या नेत्याची घमंड वाढते. कारण तो नेता पॉवरफुल्ल झालेला असतो. पण राजीवजींच्या बाबतीत मात्र अस घडल नाही, याचा परिवाराला गर्व असायला हवा. राजीवची युथ कॉंग्रेसपासूनची कारकीर्द मी पाहिली आहे. कोणाबद्दलही चुकीचे बोलायचे नाही, कोणाच्या मागूनही त्याच्याबद्दल वाईट बोलायचे नाही हा राजीवचा एक चांगला गुण होता असे राहुल गांधी म्हणाले. अनेकदा त्यांच्याबद्दल इतर लोक वाईट बोलत आहेत, असे सांगून चाचपणी केल्यानंतरही त्यांनी कधीच कोणाबद्दल वाईट शब्द काढले नाहीत. युथ कॉंग्रेसपासूनच राजीवमध्ये मी चमक पाहिली होती. राजीवने सगळ्यांसमोर राजकारणातील आदर्श अत्यंत प्रामाणिकपणे सांगितला होता. एक चांगली समज असलेला, प्रामाणिक स्वभाव असलेला राजीव मी दिवसेंदिवस विकसित होताना पाहिलेला आहे. अनेकदा युथ कॉंग्रेसमध्ये त्यांनी काम करताना काही चुकाही केल्या. पण त्या चुकांमध्ये सुधारणा करत त्याचे काम उत्तमोत्तम होत गेले. संसदेत काम करतानाही त्यांच्या स्वभावातील नेतृत्वगुण अधिक प्रगल्भ झालेला पहायला मिळाला. युथ कॉंग्रेसमध्ये जी इमॅच्युरीटी होती, ती पुढच्या काळात मागे पडत गेली असेही त्यांनी सांगितले. संसदेतील एक चांगला संसदपटू म्हणून राजीवची कामगिरी दिवसेंदिवस उंचावतच गेली. पक्षाता एक नवीन नेता तयार होताना मी समोर राजीवला पाहिलय. मी अनेकदा सांगायचो की हा तरूण नक्कीच देशासाठी काही ना काही करून दाखवणार असेही राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

राजीव सातवांसमोर कोणाचा आदर्श ?

राहुल गांधी यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना विचारले की, आप राजनितीमे किसतो आदर्श मानते हो ? तेव्हा पहिल्या रांगेत बसलेल्या अवघ्या ३० वयाच्या तरूणाचे उत्तर येते की शरद पवार. मै शरद पवार साहब को अपना आदर्श मानता हूं. राहुल गांधींना सडेतोड उत्तर देणारा हा तरूण म्हणजे राजीव सातव. ऑनलाईन श्रद्धांजली सभेतही राहुल गांधी यांनी या घटनेचा उल्लेख केला. पण त्यावेळी सोयीस्करपणे शरद पवार यांचा उल्लेख करणे टाळले. त्यामुळेच राहुल गांधी यांच्याकडून युवक कॉंग्रेसमधील तो राजकारणातील आदर्श कोण हा किस्सा अर्धवट राहिल्यासारखा वाटला.

सातवांच्या जागेसाठी पवार – राहुल गांधींमध्ये झाली चर्चा

महाराष्ट्र युवक कॉंग्रेसच्या चमकदार कामगिरीमुळेच महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या वेळी २०१४ मध्ये राहुल गांधी यांनी याच तरूणाला हिंगोलीतून जागा लढवण्याची संधी दिली. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने राजीव सातव यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला. पण राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्या हिंगोलीच्या जागेसाठी थेट शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर रायगडमधून ए आर अंतुले गटाकडून बंड होण्याची चिन्हे असतानाही त्यांनी रायगड मागून घेतला. एक तरूण नेतृत्वासाठी शरद पवार यांनी एक सकारात्मक पाऊल या निवडीच्या निमित्ताने उचलले होते. त्या विश्वासाला खर ठरवत राजीव सातव यांनी मोदी लाटेतही विजय खेचून आणला.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -