Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी ७० वर्षांत कमावलेलं आठ वर्षांत गमावलं, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

७० वर्षांत कमावलेलं आठ वर्षांत गमावलं, राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Subscribe

महागाई, बेरोजगारीवर संसदेत बोलू देत नाहीत. विरोधकांना केंद्रीय यंत्रणांची भिती दाखवली जाते, असं म्हणत या देशात गेल्या ७० वर्षांत जे कमावलं गेलं ते आठ वर्षांत मोदी सरकारने गमावलं असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकावर हल्लाबोल केला.

राहुल गांधी म्हणाले की, देशात लोकशाहीची हत्या सुरू आहे, त्याबाबत तुमचं मत काय आहे? या देशाने जे ७० वर्षांत कमावलं ते आठ वर्षांत या सरकारने गमावलं. आज देशात लोकशाही उरलेली नाही. ४ लोकांची देशात हुकुमशाही सुरू आहे. आम्ही महागाई, बेरोजगारीचे मुद्दे संसदेत मांडू इच्छितू, पण आम्हाला बोलू देत नाहीत. रस्त्यांवर अटक केली जाते, असं सांगतानाचा देशातील लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकारही सद्यस्थितीबाबत बोलायला घाबरत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

- Advertisement -

राहुल गांधी म्हणाले की, सर्वांत जास्त बेरोजगारी भारतात आहे. पेट्रो-डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ होत आहे. मात्र, अर्थमंत्र्यांना हे दिसत नाहीय. कोणत्याही गावात आणि शहरात गेलात तर तिथले लोक सांगतील किती महागाई वाढली आहे ते. मात्र सरकारला हे दिसत नाहीय.

सरकार महागाई आणि बेरोजगारीला घाबरते. जनतेच्या ताकदीलाही हे लोक घाबरतात. कारण हे सरकार खोटं बोलत आहेत. बेरोजगारी, महागाई नाहीय असं खोटं सांगितलं जातं. मी महागाई, बेरोजगारीवर बोलतो. मी खरं बोलतो, त्यामुळे माझ्यामागे यंत्रणा लावल्या आहेत. मात्र, मी खरं बोलायला घाबरत नाही. मी खरं बोलतो त्यामुळे लोक माझ्यावर आक्रमण करतात. मी जेवढं खरं बोलेन तेवढे माझ्यावर आक्रमण होणार आहे. पण मी घाबरत नाही. माझ्यावर जेवढं आक्रमण होणार तेवढं मी शिकणार. मला आवडतं.

- Advertisement -

ते म्हणाले की, हिटलरसुद्धा निवडणूक जिंकून आला होता. हिटलरकडे जर्मनीच्या संस्थांचा संपूर्ण कारभार होता. माझ्याकडेही संपूर्ण कारभार द्या, मग मी दाखवतो.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -