घरदेश-विदेशRahul Gandhi यांचा लंडनहून अचानक Sonia Gandhi यांना फोन; कोणाशी केली बातचीत?

Rahul Gandhi यांचा लंडनहून अचानक Sonia Gandhi यांना फोन; कोणाशी केली बातचीत?

Subscribe

या संवादादरम्यान काँग्रेस नेत्याने भाजप-संघ विचारधारेवरही जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या मते, भाजप (BJP) आणि संघ भारताला भूगोल म्हणून पाहतात, पण काँग्रेससाठी भारत हा माणसांचा बनलेला आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) सध्या लंडनच्या (London) दौऱ्यावर असून ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी पक्षाच्या ओव्हरसीज विंग, इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या सदस्यांची भेट घेतली. सर्वांसाठी ही भेट मोठी आश्चर्याची होती कारण त्यांची ही भेट आधीच ठरलेली नव्हती. यावेळी लंडनमध्ये पोहोचल्य़ानंतर राहुल गांधींनी सर्वांना मोठे सरप्राईज दिले. राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पक्षाच्या सुप्रीमो सोनिया गांधी यांना अचानक कॉल केला. यावेळी फोनवरील संभाषणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सर्वात जुन्या पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचे आवाहन केले. लंडन दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी ‘इंडिया ओव्हरसीज काँग्रेस’ यूकेच्या सदस्यांसोबतच्या बैठकीदरम्यान पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी अचानक फोन केला.

राहुल गांधी यांनी शनिवारी आयओसी यूके टीमच्या सदस्यांसोबत पक्षाशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांची मते ऐकण्यासाठी बैठक घेतली. आयओसी ब्रिटनचे प्रमुख कमल धालीवाल आणि इतर टीम सदस्यांनी राहुल यांना पक्षाध्यक्ष बनवण्याची विनंती केली जेणेकरून काँग्रेस त्यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर येऊ शकेल.

- Advertisement -

आयओसी तेलंगणा संघाचे सदस्य, प्रवक्ते सुधाकर गौड आणि सरचिटणीस गम्पा वेणुगोपाल यांनी 2014 मध्ये स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्माण केल्याबद्दल पक्षप्रमुखांचे आभार व्यक्त केले. पुढील वर्षी होणाऱ्या तेलंगणा विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याचे आवाहन सोनियांनी केले. बैठकीत राहुल यांनी पक्ष भारतात वैचारिक लढाई लढण्यास तयार असल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ते सोमवारी येथे खासदारांची भेट घेतील आणि केंब्रिज विद्यापीठाच्या कॉर्पस क्रिस्टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

परदेशी कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीदरम्यान, राहुल गांधी Rahul gandhi London Visit)यांनी त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केल्याचे मानले जाते की पक्ष भारतात वैचारिक लढाई लढण्यास तयार आहे. आयओसी यूकेच्या प्रवक्त्याने सांगितले की, ते एका राजकीय संघटनेशी लढत नाहीत, तर हानिकारक विचारसरणीशी लढत आहेत आणि देशाच्या संस्था वाचवण्यासाठी लढत आहेत.

- Advertisement -

न्यायपालिका आणि निवडणूक आयोगावरील वक्तव्यामुळे राहुल गांधी अडचणीत, कायदे मंत्र्यांकडून माफीची मागणी

यूके दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी शुक्रवारी आयडियाज फॉर इंडिया परिषदेला संबोधित केले, ज्यात सीपीआयचे सीताराम येचुरी, आरजेडीचे तेजस्वी यादव आणि टीएमसीचे महुआ मोईत्रा यांच्यासह इतर विरोधी सदस्य उपस्थित होते.

याआधी लंडनमध्ये झालेल्या ‘आयडियाज फॉर इंडिया’ परिषदेत राहुल गांधी यांनीही चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षावर मोठे वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, पुतिन म्हणत आहेत की मी त्यांच्या दोन जिल्ह्यांवर हल्ला करेन कारण ते कोणत्याही किंमतीवर नाटो किंवा अमेरिकेशी हातमिळवणी करू शकत नाहीत. आता येथे समांतर विचारात घ्या. युक्रेनमध्ये काय चालले आहे, लडाखमध्ये काय चालले आहे.

या संवादादरम्यान काँग्रेस नेत्याने भाजप-संघ विचारधारेवरही जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या मते, भाजप (BJP) आणि संघ भारताला भूगोल म्हणून पाहतात, पण काँग्रेससाठी भारत हा माणसांचा बनलेला आहे.


केंद्राच्या पेट्रोल-डिझेलवरील कर कपातीची पी. चिदंबरम यांनी केली पोलखोल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -