‘जनता महँगाई से त्रस्त, मोदी सरकार टैक्स वसूली में मस्त’, राहुल गांधींनी केंद्रावर साधला निशाणा

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबत काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर साधला निशाणा.

farmer protest Farmers, don't back down an inch, we are with you says rahul gandhi
शेतकऱ्यांनो, एक इंचही मागे हटू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत - राहुल गांधी

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘महागाईमुळे नागरिक आधीच हैराण झाले आहेत. तर मोदी सरकार GDP वसूल करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

‘एकीकडे महागाई गगनाला जाऊन भिडली आहे. तर दुसरीकडे जीडीपी (गॅस, डिझेल, पेट्रोल) चे दर वाढताना दिसत आहे. त्यामुळे महागाईमुळे जनतेला जीवन नकोसे झाले आहे. मात्र, दुसरीकडे मोदी सरकार गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत दिवसागणिक वाढ करत आहे. यामुळे मोदी सरकार महागाई वाढवत दुसरीकडे कर गोळा करत असल्याचे दिसून येत आहे’, असे ट्विट करत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.


केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. सरकार पेट्रोल आणि डिझेलवर त्याच्या मुळ किमतीच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारत आहे. दिल्लीत आज पेट्रोल ८५.७० रुपये तर डिझेल ७५.८८ रुपये लीटर झाले आहे. तर मुंबईत पेट्रोल ९२.२८ रुपये तर डिझेल ८२.६६ रुपये लीटर झाले आहे.

महाराष्ट्र राज्याने पेट्रोल-झिझेलच्या दरात उच्चांक गाठला आहे. राज्यातील परभणीत सर्वात महाग म्हणजे ९४.६५ रुपये प्रतीलीटर पेट्रोल असा भाव आहे. तर नंदूरबार जिल्ह्यात पेट्रोलचा दर ९२.८७ रुपये प्रतिलीटर इतका आहे. नंदूरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात पेट्रोलचे दर ९२ रुपयांच्या पुढे गेले आहेत. हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहेत.


हेही वाचा – १००, १० व ५ च्या नोटा होणार बंद ? आरबीआयचे महत्त्वाचे अपडेट