Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मोदी सरकार ब्लू टिकमध्ये व्यस्त, लसीसाठी आत्मनिर्भर व्हा राहुल गांधींची मोजक्या शब्दात...

मोदी सरकार ब्लू टिकमध्ये व्यस्त, लसीसाठी आत्मनिर्भर व्हा राहुल गांधींची मोजक्या शब्दात टीका

कोरोनाविरोधात लसीकरण अधिक वेगाने करायचे सोडून केंद्र सरकार ट्विटरसोबतच्या वादात व्यस्त

Related Story

- Advertisement -

देशात गेल्या काहीदिवसापासून ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु आहे. या वादात शनिवारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर काऊंटची ब्लू टीक हटवली होती. यावरुन केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस पाठवली होती. यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाप्रतिबंधक लसीचा डोस हवा असल्यास जनतेला आत्मनिर्भर व्हायला लागेल कारण मोदी सरकार ब्लू टीकमध्ये व्यस्त आहे. अशी टीका राहुल गांधी यांनी केंद्रसरकारवर केली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाविरोधात लसीकरण अधिक वेगाने करायचे सोडून केंद्र सरकार ट्विटरसोबतच्या वादात व्यस्त आहे. तसेच कोरोना लसीकरणाच्या रणनितीवरुनही राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत तसेच इतर नेत्यांच्या ट्विटर हँडलवरुन ब्लू टीक हटवली होती. नेत्यांनी कार्यालय सोडल्यास किंवा व्हेरिफिकेशनचे निकष पुर्ण न केल्यामुळे ब्लू टीक हटवली जाते. ब्लू टीक हटवल्यामुळे अनेक कार्यकर्ते आणि भाजपकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. तसेच केंद्र सरकारने ट्विटरला नोटीस पाठवली होती. नियमांचे कठोर पारन करा अन्यथा कारवाई करण्यात येईल. यानंतर ट्विटरकडून या उपराष्ट्रपतींच्या ट्विटर हँडलवर ब्लू टीक परत आणली आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ब्लू टीकसाठी केंद्र सरकार ट्विटरसोबत लढण्यात व्यस्त आहे. कोरोनाप्रतिबंधक लसीचा डोस हवा असल्यास आत्मिर्भर व्हा अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

- Advertisement -

देशात कोरोनाप्रतिबंधक लसींच्या वितरणावरुनही राहुल गांधी यांनी टीका केली आहे. कोरोना लसीच्या वितरणाचे योग्य धोरण नसल्यामुळे लसींचे वितरण योग्यपद्धतीने होत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी शनिवारी केला होता. लसींच्या डोसची खरेदी केंद्र सरकारने करावी आणि राज्यांना वितरित करावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. देशातील ९ रुग्णालयांना ५० टक्के कोरोना लसी मिळत असल्याचा दावाही काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -