घरअर्थसंकल्प २०२२Budget 2022: तीन कोटी युवकांनी आपला रोजगार गमावला, अर्थसंकल्पानंतर राहुल गांधींचा हल्लाबोल

Budget 2022: तीन कोटी युवकांनी आपला रोजगार गमावला, अर्थसंकल्पानंतर राहुल गांधींचा हल्लाबोल

Subscribe

राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्तावावर राहुल गांधींनी लोकसभेत भाषण केलं. यावेळी ते म्हणाले की, एक श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरिबाचा भारत, अशा प्रकारचे दोन भारत तयार होत आहेत. देशात दोन भारत तयार करण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये रेल्वेच्या नोकरीसाठी आणि रोजगार प्राप्त होण्यासाठी येथील विद्यार्थ्यांनी काय केलं आणि नक्की येथे काय घडलं याबाबत कोणतंही वक्तव्य करण्यात आलं नाही. मागील वर्षात तीन कोटी युवकांनी आपला रोजगार गमावला, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केलाय.

राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकार निशाणा साधला आहे. देशातील गरीब लोकांजवळ आज रोजगार नाहीये. तसेच याबाबत राष्ट्रपतींनी सुद्धा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे संपूर्ण भारतातील युवक रोजगार शोधण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्येक राज्यातील युवक रोजगाराच्या मागे आहे. परंतु तुमचं सरकार रोजगार देऊ शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

तीन कोटी युवकांनी आपला रोजगार गमावला

२०२१मध्ये तीन कोटी युवकांनी आपला रोजगार गमावला आहे. ५० वर्षांपेक्षा अधिक बेरोजगारी आज भारतात आहे. मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया यांच्याबाबत जरी सरकारने उल्लेख केला असला तरीदेखील युवकांना रोजगार प्राप्त होत नाहीये. हीच खरी वस्तुस्थिती आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

गरीबांचा पैसा देशातील बड्या उद्योगपतांना

राष्ट्रपतींनी देशातील बेरोजगारांबाबत एकही शब्द काढला नाही. रोजगाराची प्राप्ती कुठून आणि कशी करण्यात आली. याबाबत सरकारने शब्दही काढला नाही आणि जरी सरकारने याबाबत उल्लेख केला तरी युवकांना त्यांच्यावर विश्वास बसणार नाही. गरीबांचा पैसा देशातील बड्या उद्योगपतांना देण्यात आला. गेल्या सात वर्षामध्ये असंघटीत क्षेत्रातील आणि लघु उद्योगातील अनेक रोजगार बुडाले.

- Advertisement -

नोटबंदी, जीएसटीची चुकीची अंमलबजावणी करण्यात आली. परिणामी देशाचं नुकसान झालं. त्यामुळे ८४ टक्के भारतीयांच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला आहे आणि ते अधिक गरीब झाले. कोरोनाच्या काळात जसं कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट आले तसा दोन उद्योगपतींचा व्हेरियंट आलाय. असं म्हणत त्यांनी अदानी आणि अबांनींवर टीका केली आहे. देशातील सर्व उद्योग त्यांच्या हातात देण्याचं काम मोदी सरकारने केलंय.


हेही वाचा : Budget 2022: १ एप्रिलपासून संपत्तीच्या खरेदी-विक्रीचे TDS नियम बदलणार, घर खरेदीदारांवर काय होणार परिणाम?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -