घरताज्या घडामोडीपीएम मोदींच्या भाषणात अडथळा, टेलिप्रॉम्प्टरलाही खोटं सहन झालं नाही ; राहुल गांधींची...

पीएम मोदींच्या भाषणात अडथळा, टेलिप्रॉम्प्टरलाही खोटं सहन झालं नाही ; राहुल गांधींची मोदींवर टीका

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस अजेंडाच्या समितीमध्ये सहभाग घेतला होता. या समितीमध्ये पीएम मोदींनी भाषणाद्वारे संबोधित केलेल्या एका क्लिपला शेयर करत काँग्रेसच्या नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. यासोबतच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा पीएम मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींनी दावोस अजेंडाच्या समितीमध्ये व्हर्च्युअली सहभाग घेतला होता. जी क्लिप शेयर करण्यात आली आहे. त्यामध्ये मोदी भाषण करताना मध्येच थांबताना दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. एवढं खोटं टेलिप्रॉम्प्टरलाही सहन झालं नाही, असा आरोप करत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आहे.

- Advertisement -

राहुल गांधींनी ट्विट करत एवढं खोटं टेलिप्रॉम्प्टरलाही सहन झालं नाही, असं म्हटलं आहे. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी काऊंटर अटॅक केला आहे. दिल्लीतील भाजपचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून तांत्रिक त्रुटी आली होती, त्यामुळे पंतप्रधानांनी भाषण थांबवल्याचं म्हटलं आहे. तसेच भाषणातील काही व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये समजतंय की, टेलिप्रॉम्प्टरमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नव्हती. तर त्यांचे भाषण सर्वांना ऐकू येतं की नाही, यासाठी त्यांना व्यवस्थापकीय संघाकडून काही कालावधीसाठी थांबवण्यात आलं होतं, असं भाजपचे प्रवक्ते म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Bank FD Lock-in: बँक FDमधील लॉकईनच्या कालावधीत बदल करण्यासाठी IBAचा अर्थमंत्रालयाकडे प्रस्ताव


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -