घरताज्या घडामोडीपेट्रोल भरल्यावर बिल देताना मोदी सरकारचा महागाईतला विकास दिसेल, राहुल गांधींची खोचक...

पेट्रोल भरल्यावर बिल देताना मोदी सरकारचा महागाईतला विकास दिसेल, राहुल गांधींची खोचक टीका

Subscribe

टॅक्स वसूलीच्या महामारीच्या लाटा येत-जात असतात अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अनेक राज्यांत पेट्रोल,डिझेलच्या दर शंभरी पार झाले आहेत. कोरोना संकटात लॉकडाऊनमुळे नागरिकर घरातच आहेत. यामुळे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत. नागरिकांना पुन्हा रोजगार शोधण्यासाठी बाहेर पडत आहेत परंतु दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असल्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंधनदरवाढीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोल पंम्पावर बिल देताना मोदी सरकराचा महागाईतील विकास दिसेल अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचा भाव कमी असताना देशात मात्र अधिक किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल ९५.३१ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८६.२२ रुपये प्रति लीटर आहे. तेच मुंबईत पेट्रोल १०१.५२ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९३.५८ रुपये प्रति लीटर झालं आहे. देशातील वाढत्या पेट्रोल डिझेलच्या दरावरुन काँग्रेस वारंवार मोदी सरकारवर टीका करत आहे. काँग्रेसच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर पेट्रोलची किंमत जास्त असताना देशात मात्र कमी दर आकराला होता परंतु मोदी सरकारने पेट्रोलवर अधिक टॅक्स आकारून सामान्य जनतेची लूट केली आहे.

- Advertisement -

काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील अनेक राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होत आहे. जेव्हो पेट्रोल पंम्पावर बिल द्याल तेव्हा तुम्हाला मोदी सरकारने महागाईमध्ये किती विकास केलाय ते दिसेल. टॅक्स वसूलीच्या महामारीच्या लाटा येत-जात असतात अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -