…आता काँग्रेस कार्यकर्तेच देशाला वाचवू शकतात, राहुल गांधींची केंद्र सरकारवर खोचक टीका

Rahul Gandhi

महागाई, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी, बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. 7 सप्टेंबरपासून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू होण्याआधी महागाई ते बेरोजगारी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून भाजपविरोधात काँग्रेस रामलीला मैदानावर आंदोलन सुरू आहे. दरम्यान, बेरोजगारी आणि महागाई अशा दोन विषयांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्तेच देशाला वाचवू शकतात, असं देखील राहुल गांधींनी म्हटलं आहे.

येत्या 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत विरोधी पक्षाच्या 3,500 किलोमीटरच्या भारत जोडो यात्रेच्या आधी ही रॅली झाली. भारत जोडो यात्रा हा काँग्रेस पक्षाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा जनसंपर्क कार्यक्रम आहे, जिथे पक्षाचे नेते तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतील. महागाई आणि बेरोजगारीवरून काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, देशाचं भविष्य, महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे, त्यामुळे देशात द्वेष वाढत आहे. द्वेषामुळे लोक आणि देशाचे विभाजन होते, ज्यामुळे देश कमकुवत होतो. तुम्ही देशाची स्थिती पाहत आहात, भाजपचे सरकार आल्यापासून देशात द्वेष आणि संताप वाढत आहे. सध्याचे सरकार जनतेला घाबरवत आहे. या भीतीचा लाभ शेतकरी आणि मजुरांना मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.

दोन उद्योगपती देशाला रोजगार देऊ शकणार नाहीत. लघुउद्योग देशाला रोजगार देतात, शेतकरी देतात. देशातील सरकारी यंत्रणा दबावाखाली आहे. विरोधी पक्षांना बोलू दिलं जात नाही. देशाला रोजगार देणाऱ्यांचा कणा भाजपने मोडला आहे, असं राहुल गांधी म्हणाले.


हेही वाचा : अमेरिकेत विमान क्रॅश करण्याची धमकी देणारा वैमानिक पोलिसांच्या ताब्यात