घरअर्थसंकल्प २०२२Zer0 Sum Budget : मोदी सरकारचं झीरो सम बजेट, अर्थसंकल्पावर राहुल गांधींचा...

Zer0 Sum Budget : मोदी सरकारचं झीरो सम बजेट, अर्थसंकल्पावर राहुल गांधींचा निशाणा

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज(मंगळवार) देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाची गाडी रूळावर ठेवण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा करण्यात आली. परंतु अर्थसंकल्पानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. या अर्थसंकल्पात कोणत्याही वर्गासाठी काहीही नसून झीरो सम बजेट असल्याचं त्यांनी म्हटलंय.

मोदी सरकारचे झीरो सम बजेट

२०२२ च्या अर्थसंकल्पाबाबत राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या बजेटला मोदी सरकारचे झीरो सम बजेट असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच नोकरदार वर्ग, मध्यवर्गीय गरीब, तरूण, शेतकरी, पगारदार वर्ग आणि एमएसएमईसाठी या अर्थसंकल्पात काहीही आढळले नसल्याचे राहुल गांधींनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

हा अर्थसंकल्प सर्व सामान्यांच्या बाजूने नाहीये – ममता बॅनर्जी 

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर यावर अनेक राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया दिली जात आहे. राहुल गांधी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्दा प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे. बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणताही विशेष तरतुद करण्यात आलेली नाही. तसेच हा अर्थसंकल्प सर्व सामान्यांच्या बाजूने नाहीये, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.

- Advertisement -


हेही वाचा : Union Budget 2022: यूपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MSPबाबत सरकारकडून आश्वासनं, कोणत्या पिकांना होणार फायदा?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -