बघुया मोदींमध्ये किती दम आहे – राहुल गांधी

आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी नवी दिल्लीत बोलत होते.

Weak Modi is scared of Xi,Not a word comes out of his mouth when China acts against India - rahul gandhi

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ‘आगामी निवडणुकांमध्ये आम्ही मोदी सरकारचा पराभव करु’ अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. ‘आगामी निवडणुकांत आम्ही बॅकफूटवर खेळणार नाही’ असं वक्तव्य राहुल यांनी यावेळी केले. ‘भाजपाच्या सत्तेत मोदी हे जरी पंतप्रधान असले तरीही या सरकारचा रिमोट मोहन भागवतांकडे आहे’ अशी घणाघाती टीका त्यांना यावेळी केली. सभेदरम्यान राहुल गांधी बोलत असताना ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या जात होत्या.

काय म्हणाले राहुल गांधी…

आम्ही आता बॅकफूटवर खेळणार नाही
देशात द्वेष पसरुन राज्य करता येत नाही, मोदी सरकारने ध्यानात ठेवावे
येत्या निवडणुकीत आम्ही पाहतो मोदींमध्ये किती दम आहे ते
देशाचा रिमोट कंट्रोल आरएसएसच्या हातात आहे
आम्ही आगामी निवडणूकीत मोदी सरकारचा जोरदार पराभव करु

‘मोदी सरकारने देशाचा मूलभूत पायाच पोखरण्याचं काम केलं आहे’, असा आरोपही राहुल गांधींनी यावेळी केला. राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचंही यावेळी उदाहरण दिलं. एकूण चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेत ‘आम्हाला काम करू दिलं जात नाही’ असा आरोप त्यावेळी केला होता. लोकशाहीसाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब ठरली होती. दरम्यान, ‘भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे कामात आडकाठी करत आहेत असाच आरोप या न्यायाधीशांनी त्यावेळी शाह याचं नाव न घेता केला होता’, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.