घरदेश-विदेशराहुल गांधींनी माफी मागितली नाही ते योग्यच, सावरकर वादात तुषार गांधींची उडी

राहुल गांधींनी माफी मागितली नाही ते योग्यच, सावरकर वादात तुषार गांधींची उडी

Subscribe

नवी दिल्ली : राहुल गांधींचे ‘मोदी आडनाव’ प्रकरणी न्यायालयात माफी मागितली नाही. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व गेले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ‘मी सावरकर नव्हे गांधी आहे आणि गांधी कधीच माफी मागत नाही’, असे वक्तव्य केले होते. यावर वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात घमासाण सुरू असताना महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी राहुल गांधींच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले आहेत. राहुल यांनी माफी मागितली असती तर ते जे बोलले ते सत्य नाही, हे सिद्ध झाले असते, असे तुषार गांधी म्हणाले.

तुषार गांधी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधीं काहीच चुकीचे बोलले नाही असे सांगून त्यांना खंबीरपणे पाठींबा दर्शविला आहे. तुषार गांधी म्हणाले की, राहुल गांधी यांनी मोदी आडनाव प्रकदरणी न्यायालयात माफी मागितली नाही. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत मी सावरकर नव्हे गांधी आहे, गांधी कधीच माफी मागत नाही, असे म्हटले. या प्रकरणी वृत्तसंस्थेने तुषार गांधी यांना प्रश्न विचारला की, माफी मागून संसदेत राहणे चांगले नाही का?

- Advertisement -

यावर तुषार गांधी म्हणाले की, जर त्यांनी माफी मागितली असती तर ते जे बोलले ते सत्य नाही, हे सिद्ध झाले असते. राहुल गांधींच्या वक्तव्याचा कोणत्या जातीचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता. त्यामुळे मला वाटते की राहुल जे काही बोलले यात कुणाविषयीही घृणा नव्हती. भाजपा या वक्तव्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय राहुल गांधींना अडकवले जात आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यामुळे राहुल गांधींना उच्च न्यायालयात दोषी ठरले तरी त्यांनी माफी मागावी, असे मला वाटत नाही. हे एक ऐतिहासिक तथ्य आहे की, सावरकरांनी माफी मागून स्वत:ची सुटका केली होती.

राहुल गांधींविषयी माझ्या मनात खूप आदर असल्यामुळए मी त्यांच्या भारत जोडो यात्रेत त्यांना साथ देण्यासाठी गेलो होतो. गेल्या १० वर्षांबाबत बोलायचे झाले तर, राहुल गांधींनी स्वत:ला बदलले आहे. त्यामुळे त्यांचा आश्वासक आवाज राजकारणात उठून दिसत आहे. राहुल यांनी वेगळ्याप्रकारचे नेतृत्व करण्याठी परिश्रम घेतले, पण काँग्रेस नेतृत्वाला स्वत:ला सुधारणा करण्याची गरज असल्याची खंतही तुषार गांधी यांनी यावेळी बोलून दाखवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -