घरदेश-विदेशRahul Gandhi : 'त्या' व्हिडीओवर राहुल गांधींचे स्पष्टीकरण, म्हणाले - "कुत्र्यांनी भाजपाचे...

Rahul Gandhi : ‘त्या’ व्हिडीओवर राहुल गांधींचे स्पष्टीकरण, म्हणाले – “कुत्र्यांनी भाजपाचे काय बिघडवले?”

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. देशभरात या न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या या यात्रेवर सत्ताधाऱ्यांकडून कायमच टीका करण्यात येत आहे. या यात्रेदरम्यान राहुल यांनी एका कुत्र्याला बिस्किट खाऊ घातल्यानेही त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून याबाबत आता राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कुत्र्यांनी भाजपाचे काय बिघडवले आहे? असा प्रश्न राहुल यांच्याकडून उपस्थित केला आहे. (Rahul Gandhi’s explanation on ‘that’ video, said – “What did the dogs do to the BJP?”)

हेही वाचा… Rahul Gandhi : ‘भाजपाने दिवस मोजायला सुरुवात करावी’, राहुल गांधींनी जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर साधला निशाणा

- Advertisement -

भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी कारच्या छतावर बसून कुत्र्याला बिस्किट खाऊ घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. कुत्रा बिस्किट खात नाही तेव्हा राहुल गांधी ते बिस्किट शेजारी उभ्या असलेल्या कार्यकर्त्याला देतात, असे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओवरून भाजपाने राहुल गांधींवर हल्लाबोल केला. याबाबत राहुल यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले. पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, यात नेमका मुद्दा काय आहे? जेव्हा त्या कुत्र्याला माझ्याकडे आणण्यात आले, तेव्हा तो घाबरला होता. तो थरथरत होता. मी त्याला बिस्किट खायला दिले, त्याने तेव्हा ते खाल्ले नाही, म्हणून ते बिस्किट त्या व्यक्तीला दिले आणि म्हणालो तुम्हीच ते त्याला खायला द्या. पण भाजपावाल्यांना काय वेड लागले आहे माहीत नाही? कुत्र्यांनी त्यांचे काय नुकसान केले आहे? असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला.

खरे तर पल्लवी सीटी नामक भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत या महिलेने लिहिले आहे की, हिमंत बिस्वा सरमा यांच्यानंतर काँग्रेसने आणखी एका समर्थकाला कुत्र्याच्या ताटातूनच बिस्किटे दिली आहे. यांवर उत्तर देत हिमंत सरमा यांनी म्हटले की, पल्लवीजी, फक्त राहुल गांधीच नाही तर संपूर्ण कुटुंब मला ते बिस्कीट खाऊ घालू शकले नाही. मला आसामी आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे. मी बिस्कीट खाण्यास नकार दिला आणि काँग्रेसचा राजीनामाही दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -