घरदेश-विदेशराहुल गांधी देशाच्या एकतेसाठी अत्यंत धोकादायक, केंद्रीय कायदे मंत्र्यांची जहरी टीका

राहुल गांधी देशाच्या एकतेसाठी अत्यंत धोकादायक, केंद्रीय कायदे मंत्र्यांची जहरी टीका

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकार आणि भारतातील परिस्थितीवर जोरदार टीका करत आहेत. यामुळे देशातील राजकारण तापले असून, भाजप नेतेही आता राहुल गांधीवर टीका करताना दिसत आहेत. राहुल गांधी देशाच्या एकतेसाठी अत्यंत धोकादायक असल्याची घणाघाती टीका केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी केली आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी पप्पू आहेत, हे भारतातील लोकांना माहीत आहेत, पण परदेशातील लोकांना ते माहीत नाही. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. भारताचे तुकडे करण्यासाठी ते चिथावणी खोर भाषणे करत आहेत. त्यांच्या मूर्खपणाच्या विधानांना उत्तर देण्याची गरज भारताला गरज नाही, पण त्यांच्या विधानांचा वापर देशविरोधी शक्ती भारताची प्रतिमा डागाळण्यासाठी करत आहेत.

- Advertisement -

केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींच्या केंब्रिजमधील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचा नाश करत असल्याचा उल्लेख केला आहे. भारतात शीख, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजेच लोक राहतात आणि ते सर्व भारताचे नागरिक आहेत, पण नरेंद्र मोदींचा तसा विश्वास नाही. मोदी त्यांना भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे नागरिक मानतात.

- Advertisement -

भारतात बोलू दिले नसल्याचा याआधीही आरोप
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच आरोप केला होता की, त्यांना भारतात बोलू दिले जात नाही. या टीकेवरही रिजिजू यांनी पलटवार करत म्हटले की, ‘राहुल गांधी असोत किंवा विरोधी पक्षातील इतर कोणीही, हे लोक २४ तास भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देतात आणि तरीही त्यांना बोलू दिले जात नाही, असे सर्वांना सांगतात.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -