घरताज्या घडामोडीराहुल आणि प्रियंका गांधी यांचे बंधूप्रेम होतेय व्हायरल; पाहा व्हिडीओ

राहुल आणि प्रियंका गांधी यांचे बंधूप्रेम होतेय व्हायरल; पाहा व्हिडीओ

Subscribe

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि नेत्या प्रियंका गांधी यांचे बंधुप्रेम सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' उत्तर प्रदेशकडे सरकत असताना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यातील भावा-बहिणीच्या प्रेमाची सुंदर अभिव्यक्ती पाहायला मिळाली.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि नेत्या प्रियंका गांधी यांचे बंधुप्रेम सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ उत्तर प्रदेशकडे सरकत असताना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यातील भावा-बहिणीच्या प्रेमाची सुंदर अभिव्यक्ती पाहायला मिळाली. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल आणि प्रियंका गांधी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी त्यांची बहीण प्रियंका गांधी यांची काळजी घेताना दिसत आहेत. (rahul gandhi hugs kisses sister priyanka gandhi amid bharat jodo yatra congress shares video)

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर 3 जानेवारी रोजी व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांनी दिल्ली-यूपी सीमेवर लोणी येथे ध्वज हस्तांतरण कार्यक्रमावेळी आपल्या बहिणीवर प्रेम व्यक्त करताना दिसत होते. तसेच, व्यासपीठावर सर्वांसमोर राहुल गांधी यांनी प्रियंका गांधींना मिठी मारली आणि कपाळाचे चुंबन घेतले आणि कपाळावर हात फिरवून तिला मिठी मारली.

- Advertisement -

काँग्रेसची भारत जोडो यात्रा यूपीमध्ये दाखल झाली आहे. उत्तर प्रदेशातील बागपत येथील मावी कलान येथे रात्रीच्या विश्रांतीनंतर बुधवारी सकाळी ६ वाजता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ पुन्हा सुरू झाली.

या यात्रेत राष्ट्रीय लोकदलाचे (आरएलडी) जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली. राहुल गांधींनी ‘एकता भारत’ या मोहिमेत 12 राज्यांमध्ये 3,570 किमी चालण्याची योजना आखली आहे. काश्मीरमधून हा प्रवास संपणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दिल्लीत आणखी एक निर्दयी घटना; मैत्री तोडल्याने मैत्रिणीवर केले चाकूने सपासप वार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -