घरताज्या घडामोडीटाळ्यांनी आणि दिव्यांनी कोरोनाची समस्या सुटणार नाही - राहुल गांधी

टाळ्यांनी आणि दिव्यांनी कोरोनाची समस्या सुटणार नाही – राहुल गांधी

Subscribe

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी देशवासियांना ५ एप्रिलला रविवारी रात्री ९ घरातल्या लाईट बंद करून घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीमध्ये उभं राहून मेणबत्ती, दिवा, टॉर्च, मोबाईलचा फ्लॅश ९ मिनिटं लावा, असं आवाहन केलं. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी म्हटलं की, देशात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पुरेशा चाचण्या होत नाही आहेत. लोकांनी टाळ्या वाजवून आणि दिवे लावून कोरोनाचं संकट दूर होणार नाही, असं म्हणतं राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे.

काँग्रेचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज ट्विटच्या माध्यमातून कोरोना व्हायरस चाचणीची व्याप्ती वाढविण्यात यावी अशी मागणी केली आहे. राहुल गांधी म्हणाले, भारत अजूनही कोविड-१९चा सामना करण्यासाठी पुरेशा चाचण्या करत नाही आहे. लोकांनी टाळ्या वाजवून आणि दिवे लावल्यामुळे समस्या सुटणार नाही.

- Advertisement -

राहुल गांधी ट्विटमध्ये एक आलेख शेअर केला आहे. यामध्ये आपल्या देशाच्या तुलनेत पाकिस्तान, श्रीलंका, ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, इटली आणि साऊथ कोरिया या देशांमध्ये कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात होता दाखवलं आहे. याअगोदर प्रियांका गांधी देखील कोरोनाच्या चाचणीत वाढ करण्याच यावी अशी मागणी केली होती.

- Advertisement -

 


हेही वाचा – देशात ३० टक्के कोरोनाग्रस्त तबलिगी जमातचे! २२ हजार क्वॉरंटाईन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -