घरताज्या घडामोडीराहुल गांधी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची शक्यता ; 'या' महिन्यात पूर्ण होणार...

राहुल गांधी पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची शक्यता ; ‘या’ महिन्यात पूर्ण होणार निवडणूक प्रक्रिया

Subscribe

काँग्रेस पक्षामध्ये मागील अनेक वर्षांपासून अध्यक्षपदासाठी चर्चेला उधाण आलं आहे. परंतु आता त्याला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस संघटना निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, राहुल गांधी आगामी वर्षातील सप्टेंबर महिन्यात काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळणार आहेत. सप्टेंबर महिन्याअखेरीस पक्षाच्या अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. काँग्रेसकडून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तयार आहेत. मात्र, पक्षाची जबाबदारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी सांभाळत आहेत. त्यामुळे आगामी वर्षातील ऑक्टोबर महिन्यात घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच अध्यक्षपदासाठी ऑगस्ट आणि सप्टेंबर दरम्यान निवडणुका होऊ शकतात.

काँग्रेस पक्षासाठी नवीन अध्यक्षपद मिळण्याची शक्यता

आगामी वर्षातील सप्टेंबर महिन्यापर्यंत काँग्रेस पक्षासाठी नवीन अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२४ मध्ये नवीन चेहऱ्यासोबतच काँग्रेस निवडणूक लढणार आहे. राहुल गांधी काँग्रेसची धुरा सांभाळण्यास तयार आहेत. राहुल गांधी अध्यक्षपदासाठी उभे राहिल्यास त्यांच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल करणार नाही. अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची संधी असली तरी राहुल गांधी अध्यक्षपदी विराजमान होणार हे निश्चित असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी मंगळवारी निवडणूक प्रक्रियेचा प्रगती अहवाल सोनिया गांधी यांना सादर केला. पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत पक्षाला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे, असं सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर मिस्त्री म्हणाले.


हेही वाचा : नितेश राणेंच्या अटकेसाठी नारायण राणेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न – प्रवीण

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -