घरदेश-विदेशपर्रिकरांना भेटले राहुल गांधी, केली तब्येतीची चौकशी

पर्रिकरांना भेटले राहुल गांधी, केली तब्येतीची चौकशी

Subscribe

राफेल प्रकरणावरुन मनोहर पर्रिकरांवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी त्यांची अशी अचानक भेट घेणं, हा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे.

पर्रिकरांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी स्थानिक काँग्रेस आमदारांशीदेखील सवांद साधला. सूत्रांनुसार, राहुल यांनी आमदार आणि कार्यकर्त्यांकडून स्थानिक प्रश्नांविषयी तसंच कामाविषयी माहिती जाणून घेतली. राहुल गांधी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लवकरच गोवा दौरा करणार असून, या दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या महारॅलीचे आयोजन करण्यात येणार असल्याचंही सूत्रांकडून समजत आहे.

- Advertisement -

गांधी- पर्रिकर भेटीची चर्चा

राफेल प्रकरणावरुन राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने  मनोहर पर्रिकरांवर यांच्यावर अनेक आरोप केले होते. ‘राफेल कराराची कादगपत्रं पर्रिकर यांच्या घरात आहेत’, असा आरोप काँग्रेसकडून वेळोवेळी करण्यात आला होता. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी पर्रिकरांची अशी अचानक भेट घेणं, हा चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या राहुल गांधी आणि सोनिया गांधींसोबत खासगी गोवा दौऱ्यावर आहेत. आता या दौऱ्यादरम्यान पर्रिकरांची भेट घेऊन, त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यामागे राहुल यांचा नेमका उद्देश काय होता? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -